जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव मतदार संघाच्या विविध प्रश्नांकडे आ.काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या जिव्हाळ्याच्या पाट पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहर,ग्रामीण पोलीस स्टेशनची रिक्त पदे तातडीने भरावीत,कोपरगाव शहरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावेत,वीज रोहित्रांची संख्या वाढवून मिळावी,शहा येथील १३२ के.व्ही.चे सब स्टेशनला मतदार संघातील वीज उपकेंद्र तातडीने जोडण्यात यावे अशा विविध प्रश्नाकडे आ.आशुतोष काळे यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाने नुकतीच दिली आहे.

या प्रसिद्धि पत्रकात आ.काळे यांनी म्हटले आहे की,”माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे २०२२ रोजी कोपरगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी तसेच कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कोपरगाव मतदार संघात आले असता त्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी निधी देण्याची जाहीर घोषणा केली होती. त्या निधीतून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत त्या कामांना तातडीने प्रारंभ करून लवकरात लवकर काम पूर्ण करून पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचे निवासस्थान मिळावे. त्याचबरोबर कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.या दोनही पोलीस स्टेशनसाठी सहाय्यक फौजदार,हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल,पोलीस नाईक,लेडीज कॉन्स्टेबल ही पदे मंजूर असून देखील या कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.
  कोपरगाव तालुक्याची मोठी लोकसंख्या व पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण पोलीस यंत्रणेवर पडत असून परिणामी वेळप्रसंगी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तातडीने या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी व गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यासाठी कोपरगाव शहरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.

कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ६५० वीज रोहित्रांवर ओव्हर लोड आहेत. त्यामुळे सातत्याने विज रोहित्र नादुरुस्त होवून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात अतिरिक्त वीज रोहित्रांची संख्या वाढवून मिळावी. तसेच वारी वीज उपकेंद्रासाठी मंजूर असलेल्या ५ एम. व्ही.ए. च्या ट्रान्सफॉर्मरचे काम तातडीने पूर्ण करावे. रवंदे वीज उपकेंद्रासाठी ५ एम. व्ही.ए. चा ट्रान्सफॉर्मर मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळावी.

सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही.चे सबस्टेशन कार्यान्वित झाले असून त्या सबस्टेशनला  कोपरगाव तालुक्यातील वीज उपकेंद्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे कोपरगावच्या वीज उपकेंद्रावरील भार कमी होवून पूर्ण क्षमतेने सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तातडीने शहा येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनला कोपरगाव तालुक्यातील वीज उपकेंद्र जोडण्याचे काम सुरू करावे व कोपरगाव शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात आदी प्रश्नांकडे आ.आशुतोष काळे यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close