शैक्षणिक
कोपरगावातील…या महाविद्यालयाचा मलेशिया विद्यापीठाशी सांमजस्य करार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मलेशियातील यु.आय.टी.एम.मारा विद्यापीठ,केदाह ब्रँचशी स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाचा एम.ओ.यु.अर्थात सांमजस्य करार नुकताच ऑनलाईन पध्द्तीने संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
“कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने मलेशियातील उपरोक्त प्रतिष्ठित विद्यापीठातील अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागाची सुवर्णसंधी मिळेल.त्याचबरोबर येथील प्राध्यापकांना मलेशियातील यु.आय.टी.एम. मारा विद्यापीठात अध्यापन,संशोधन आदी उपक्रमात सहभागी होता येईल”डॉ.बी.एस.यादव.प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव पुढे म्हणाले कि,”या सामंजस्य करारामुळे दोन्ही शैक्षणिक संस्थामध्ये फॅकल्टी एक्सचेंज,स्टुडंट एक्सचेंज,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे,परिसंवाद तसेच सांस्कृतिक आदान प्रदानास चालना मिळेल.कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने मलेशियातील उपरोक्त प्रतिष्ठित विद्यापीठातील अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागाची सुवर्णसंधी मिळेल.त्याचबरोबर येथील प्राध्यापकांना मलेशियातील यु.आय.टी.एम. मारा विद्यापीठात अध्यापन,संशोधन आदी उपक्रमात सहभागी होता येईल.या कराराच्या वेळी मारा विद्यापीठाच्या केदाह ब्रँचचे प्रमुख प्रो.डॉ.मुहम्मद अब्दुल्ला हेमदी,उपप्रमुख डॉ.कमरुद्दीन ओथमन,मि.अजलान रहमान,समन्वयक सियाझलियाती इब्राहिम मॅडम तसेच सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ.रविंद्र जाधव,आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ.व्ही.सी.ठाणगे,डॉ.के.एल गिरमकर,डॉ.एस.आर.पगारे,डॉ.बी.बी.भोसले,डॉ.अभिजित नाईकवाडे व डॉ.एस.एल.अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपरोक्त कराराच्या वेळी प्रो.डॉ.मुहम्मद हेमदी म्हणाले की,”मागील शैक्षणिक वर्षापासून सोमैया महाविद्यालयासोबत झालेल्या सांस्कृतिक आदान-प्रदान व आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाला आदी अनेक शैक्षणिक उपक्रमांचेच हे फलित आहे.त्याचबरोबर या सामंजस्य करारामुळे भविष्यात ही अनेक संशोधनात्मक सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम दोन्ही संस्थेदरम्यान राबविले जातील.
हा करार म्हणजे सोमैया महाविद्यालयासाठी एक मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी काढले तर संस्थेचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी व सदस्य संदीप रोहमारे यांनी समाधान व्यक्त केले आहे.