धार्मिक
माणसाचे जीवन सफल होण्यासाठी ईश्वर कृपा आवश्यक-मिरीकर

न्यूजसेवा
संवत्सर-कोपरगाव-(प्रतिनिधी)
परमेश्वराची कृपा असल्याशिवाय माणसाचे जीवन सफल होऊ शकत नाही त्यामुळे जीवन सफल करण्यासाठी परमेश्वर हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
दरम्यान या ठिकाणी गर्दी होते हि बाब तालुक्यातील नेत्यांना अवगत असल्याने आपले छायाचित्र निदर्शनास येण्यासाठी तालुक्यातील सहकारातील नेते सभासदांच्या पैशाने सदर शृंगऋषींच्या आश्रमाजवळ मोठमोठ्या आकारात आपली छबी असल्याचे कटआऊट लावतात.अशाच काही आजी माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांच्या चेल्यानी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंडप व कटआऊट लावले होते.मात्र दुपारून अचानक गोदावरी नदीस पूरपाणी वाढले आणि त्यात माजी लोकप्रतिनिधी असलेल्या एका महिलेची छबी असलेले मंडप व कटआऊट वाहून गेल्याने संवत्सर परिसरात व भाविकांत महिला वाहून गेल्याची अफवा पसरली होती.त्यामुळे अनेक वाहिन्यांचे भ्रमणध्वनी स्थानिक नेत्यांना खणखणत होते.मात्र शेवटी ती अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.
ऋषी पंचमी हे हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे,भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात.यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले आहे.या दिवशी संवत्सर या ऐत्याहसिक ठिकाणी गोदावरी काठी महिला स्नानासाठी येतात.हा मुहूर्त साधून तत्कालीन नेते नामदेवराव परजणे यांनी या ठिकाणी ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचे कीर्तन परंपरा सुरु केली आहे.ती दोन वर्षाच्या कोरोना कालखण्ड अपवाद वगळता अव्याहत सुरु आहे.या वर्षी ऋषी पंचमीनिमित ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले हॊते त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी संवत्सर येथील महंत राजधर बाबा,गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समीतीचे माजी सदस्य कृष्णा परजणे,माजी आ.कोल्हे,संवत्सर ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,कर्मवीर काळें सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे,संजीवानीचे संचालक फकीरराव बोरणारे,बापूसाहेब बोरणारे,भानुदास महाराज,वाल्मिक महाराज,लक्ष्मण साबळे,रामचंद्र कासार,खंडू पा.फेफाळे, लक्ष्मणराव परजणे,भरत बोरणारे,सोमनाथ निरगुडे,आदींसह मोठ्या संख्येने भाविक,महिला उपस्थित होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”माणसाला जीवनात पैसा,प्रसिद्धी मिळते पण परमेश्वराचे नाम मुखी नसल्याने सुख मिळत नाही.कोरोना काळात अनेकांचे प्रपंच होत्याचे नव्हते झाले काही बचावले आहे.जे बचावले ते केवळ परमेश्वरी शक्तीमुळे असा दावा करून श्वास थांबला म्हणजे सर्व काही थांबते.जग हे श्वासावर व समाज विश्वासावर चालू आहे.भगवंताने आपले सर्व गुण आपल्या भक्तांना प्रदान केले आहे.तो उदार व तत्ववादी आहे.आज माणूस खा-खा खातो आहे.कोणी कुणाचा विचार करत नाही.जो तो स्वार्थी प्रवृत्ती मूळे हातचा राखून आहे.दुसऱ्याच्या खाण्यावर त्याचे लक्ष आहे.आज अनेक जण सहकाराच्या गेस्ट हाऊस मधून फुकटचे खात आहे.फुकटचे खाण्यावर त्याचे लक्ष आहे.त्यामुळे सहकारी चळवळ डबघाईला आली असल्याचा टोला उपस्थित सहकारातील नेत्याना लगावला आहे.व या खाण्याच्या अपप्रवृत्तीमुळे नगर-मनमाड या राज्य मार्गाची वाट लागली असल्याचा शालजोडा हाणला आहे.या रस्त्याची वाट लागलेली पाहून वाईट वाटत असल्याचे सांगून त्यांनी उत्तरेतील नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली आहे.
सदर प्रसंगी कीर्तन सेवेपूर्वी त्यांच्या हस्ते महंत राजधर बाबा यांचे वायू उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले आहे त्याचे छायाचित्र.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”परमेश्वराने सर्वांना बुद्धी आणि विद्या दिली आहे.ती सर्वांना सारखी नसल्याने अनेक जण वंचित राहत आहेत.वर्तमानात विद्या देताना कोणीही थोडी फार मागे ठेवतो.मात्र आपले ऋषी मुनी मात्र हातचे राखून ठेवत नसल्याचा दावा करून त्यांनी प्रभू रामचंद्र व त्याचा एक वर्गमित्र नावाड्याचा मुलगा यांचे उदाहरण दिले आहे.त्यामुळे ऋषी पत्नीस ऋषींनी सांगितले होते की,”गरीब श्रीमंत भेदभाव करू नका.प्रभू रामचंद्र हे देव आहे तर केवट हा गरिबांचा मुलगा आहे.त्या दोघांनाही ऋषी आणि ऋषी पत्नी सामान वागणूक देत होत्या असे सांगून परमेश्वर आणि माणसातील फरक लक्षात आणून दिला आहे.
आज लोक पदासाठी व मोठे होण्यासाठी स्पर्धा करत आहेत.माणसे लोभी असल्याने एकमेकांच्या डोक्यात दगड घालण्यास मागेपुढे पाहत नाही.राजकारणात गरिबाला किमंत नाही,समाजात समानता नाही यावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.आज राजकीय क्षेत्रात येणाऱ्याने सर्वांना सामान वागणूक द्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पूर्वी राजे महाराजे राज्य शकट हाकण्यासाठी ऋषी मुनींचा सल्ला घेत असत.ज्ञानार्जनासाठी चांगलेच ठीकाण हवे असे काही नव्हते.म्हणून संत तुकारामांनी भंडाऱ्याच्या डोंगरात आपले अभंग लिहिले असल्याचे उदाहरण त्यांनी दिले आहे.मांडवी ऋषींच्या आश्रमात एका चोरट्याने चोरी करून साहित्य आणून टाकले असतां त्यांना फाशीची शिक्षा झाली होती.त्यांनी ती ईश्वराचे नामस्मरण करून ते संकट परतून लावले असल्याचे उदाहरण दिले आहे.त्यामुळे सुळाचे पाणी झाले असल्याचे नमूद केले आहे.परमेश्वराचे चिंतन केले म्हणूनच ते दुःखातून मुक्त झाले होते.असे सांगून त्यांनी परमेश्वराचे चिंतन करण्याचा सल्ला शेवटी दिला आहे.