जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज- आ.काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मुठभर मावळ्यांच्या मदतीने शून्यातून अखंड हिंदवी स्वराज्याचे स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरे शेतकऱ्यांचे कैवारी होते. बिनचूक नियोजन व अचूक व्यवस्थापन कसे असावे याचा आदर्श महाराजांनी जगापुढे ठेवला असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष जुनेद शेख,युवकाध्यक्ष नवाज कुरेशी, आब्बास मणियार, असिफ मणियार, फिरोज पठाण, इरफान तांबोळी, जावेद शेख,आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणाबरोबर इतर धर्मांचेही रक्षण केले. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान न्याय व समान वागणूक देऊन समाजात एकोपा ठेवला त्याला आदरांजली म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले-हापीज शेख

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे,प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार,माधवी वाकचौरे,सैदाबी शेख, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, युवकाध्यक्ष नवाज कुरेशी, नामदेव मोरे, दिनार कुदळे, फकीर कुरेशी,आदी मान्यवरांसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, आदी प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेवा फौंडेशनचे कोपरगाव व जीवन ज्योती रक्तपेढी, धुळे शाखा आत्मा मलिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांना आ. काळे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकून ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रमाणे महाराजांनी शेती व शेतकरी समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले तोच आदर्श व त्याच विचारांनी महाविकास आघाडी सरकारची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे कल्याण करणारे शासन म्हणून सरकार चोख काम करीत आहे. राज्यातील जनतेला अपेक्षित असलेले शेतकऱ्यांचे हित जोपासणारे महाविकास आघाडीचे सरकार समाजातील सर्वच घटकांना योग्य न्याय देण्याचे काम करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश्न सोडवून कोपरगाव विधानसभा मतदार संघाला. पुन्हा विकासाच्या वाटेवर आणणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close