कोपरगाव तालुका
कोपरगावातील आजी माजी दोन लोकप्रतिनिधी कोरोना बाधित !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हेही कोरोना चाचणी अहवाल बाधित आला आहे अशी माहिती हाती आली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आले असून त्या पाठोपाठ आज तालुक्याचे आ.आशुतोष काळे हे बाधित आले असल्याची माहिती आ.काळे यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
आ.आशुतोष काळे यांची प्रकृती उत्तम असल्याचा दावा केला आहे.त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.माझ्या तब्बेतीची काळजी करण्याचे कारण नाही.मात्र माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
तर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनाही कोरोना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे याबाबत त्यांच्या समर्थकांनी काळजी व्यक्त केली आहे.व त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर आ.काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल बाधित आल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच सामाजिक संकेतस्थळावर कार्यकर्त्यांनी,हितचिंतकांनी तब्बेतीची काळजी घ्या,लवकर बरे व्हा अशा आशयाच्या भावनिक पोस्ट टाकून सहानुभूती व्यक्त केली आहे.ना.काळे यांनी देखील या भावनिक पोस्टला सामाजिक संकेत स्थळावरून उत्तर देत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून आपल्या आशीर्वादाने व साईबाबांच्या कृपेने लवकरच जनसेवेसाठी हजर होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.