धार्मिक
शिर्डीत श्री साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्थेच्या व्दारावती भक्तनिवासमधील रुममध्ये आढळुन आलेले २४ हजार ५०० रुपये आऊटसोर्स सफाई कामगार विकास पगारे व संदिप आरणे यांनी प्रामाणिकपणे संस्थानकडे जमा केली असून या दोन्ही कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थित त्यांचा सत्कार केला आहे.
शिर्डी साई संस्थानचे आऊटसोर्सचे प्रामाणिक सफाई कामगार विकास पगारे व संदिप आरणे या दोन्ही कर्मचा-यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला. तर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांनी या कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.
दिनांक १८ जानेवारी रोजी साईभक्तांनी रुम क्रं.२५५ ही दुपारी ०२ वाजता खाली केली.त्यानंतर आऊटसोर्स ठेकेदार सुमित फॅसिलीटीज पुणे यांचे सफाई कामगार विकास पगारे व संदिप आरणे यांनी रुम साफ सफाई केली असता.त्यांना खाटेवरील गादीखाली काही रक्कम आढळुन आली. त्यांनी लगेच तेथील मदतनीस व पर्यवेक्षक यांना ही बाब लक्षात आणुन दिली. त्यानंतर पर्यवेक्षक यांनी रुम घेतलेल्या साईभक्तास संपर्क करुन याबाबत विचारले असता त्यांनी आमचे कुठलेही सामान अथवा रोख रक्कम विसरलेली नाही असे कळविले.
त्यानंतर सदर रक्कमेचा संरक्षण विभागामार्फत पंचनामा करण्यात आला.सदरची रक्कम ही २४ हजार ५०० रुपये असल्याचे नमुद करण्यात येवुन ती रक्कम संस्थानच्या लेखाशाखा विभागाकडे दिनांक १९ जानेवारी रोजी जमा करण्यात आली आहे.
आऊटसोर्सचे प्रामाणिक सफाई कामगार विकास पगारे व संदिप आरणे या दोन्ही कर्मचा-यांच्या या प्रामाणिक पणाबद्दल श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला. तर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व सर्व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांनी या कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.