जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अहिंसा हातमाग केंद्राच्या मालास जागतिक बाजारपेठ मिळवुन देऊ – इलेनिता सँड्रॉक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील अहिंसा हातमाग केंद्राला असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन क्रेडिट युनियनचे अध्यक्ष रणजित हेत्तीयाराची, मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता सँड्रॉक यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी सदिच्छा भेट दिली आहे.

कोपरगाव शहरातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत ‘इंटरनॅशनल सिस्टर सोसायटीच्या’ उद्घाटन प्रसंगी त्या उपस्थित होत्या. सदिच्छा भेटी प्रसंगी रणजित हेत्तीयाराची व इलेनिता सँड्रॉक यांचा अहिंसा हातमाग केंद्राच्या व्यवस्थापिका शोभना ठोळे यांनी कुर्ता, साडी व स्टोल भेट देऊन सत्कार केला.

रसायन विरहीत कपड्यांची निर्मिती हि आज काळाची गरज आहे. गरज ओळखून अहिंसा हातमाग केंद्राच्या महिलांनी व्यवसायातून व्यक्तिंच्या आयुष्यातील रसायन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या महिला उत्पादित करत असलेल्या हातमागावरील मालाला जागतिक स्तरावरील बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न पूर्णतः यशस्वी व परिपूर्ण करणार आहे-श्रीमती इलेनीता संड्रॉक

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक पूजा पापडीवाल यांनी केले. त्या म्हणाल्या कि, ‘आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांच्या आशीर्वाद व प्रेरणेमुळे ४ महिलांनी ३ वर्षांपूर्वी चालू केलेल्या या रसायन विरहीत आजार प्रतिबंधक व उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करणाऱ्या हातमाग उत्पादनास महाराष्ट्रात नाशिक, धुळे, पुणे, मुबई येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे’. अहिंसा हातमाग केंद्राद्वारे सुरु केलेल्या व्यवसायामुळे महिलांना रोजगार निर्मिती देखील झाली असून महिला कर्मचारी आर्थिकदृष्ट्या संपन्न बनत चालल्या आहेत’. उत्कृष्ट कापड निर्मितीमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रयत्नांतून आता आमच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार असल्याने आम्हा सर्वांना अतिशय आनंद झाला आहे’.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, लिओ क्लब ऑफ समताचे अध्यक्ष कुलदिप कोयटे,अरुणा लोहाडे व सर्व हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा पापडीवाल यांनी केले तर उपस्थितांचे आभार अहिंसा हातमाग केंद्राच्या व्यवस्थापिका शोभना ठोळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close