कोपरगाव तालुका
डॉ सोनाली चिने यांना पी एच.डी पदवी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-( प्रतिनिधी )
सदर कार्यकमास संजीवनीचे माजी संचालक शिवाजीराव कदम, माजी सरपंच विजयराव कदम , ग्रा उपसरंपच दिगंबर बढे, गौतम पॉलटेक्निक कॉलेजचे ओ .एस .आणासाहेब बढे , डॉ . विश्वबर कदम, सोपानराव चिने, पांडुरंग चिने, रविंद्र चिने , डॉ . विजय गोडगे , सतीष कदम, प्रभाकर चिने, सुनिल कदम, पत्रकार संजय भारती, रिनाकांत कबाडी ,दत्ता चिने,, कल्पना चिने , ज्योती चिने असे अनेक ग्रामस्थ व महिला तसेच शनेश्वर भजनी मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते .
सत्कार मुर्ती डॉ .सोनाली चिने बोलतांना म्हणाल्या कि, मी संसार – प्रपंच्याची धुरा सांभाळत ध्येयपूर्ति केली. या कामी माझे पती माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले . पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, ” आई- बाबा तुम्हीच माझे प्रेरणास्थान ,तुमच्या उदरी जन्म घेतल्याचा वाटतो मला अभिमान ” आपल्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आई वडीलांचा मुलांना सार्थ अभिमान असावा असा संदेश त्यांनी भावी पिढीस दिला. त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक वारुळे यांनी केले व शेवटी डॉ सुयोग पवार यांनी मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले ..