कोपरगाव तालुका
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोहळा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या प्रसंगी श्री.गो.विदयालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशनचे अध्यक्ष कैलास ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांचे हस्ते करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
विदयालयाचे पर्यवेक्षक गायकवाड आर.बी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.ए.जे.कोताडे यांनी मानले.या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,श्रीमती यु.एस.रायते,आर.आर.लकारे,एस.एन.शिरसाळे,के.एस.गोसावी,ए.के.काले,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.