जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय-कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेची आपण गेली अनेक वर्षापासून ग्राहक असून समतात ग्राहकाला त्वरीत मिळणारी सेवा आणि समताचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सेवा देणारे सर्वच कर्मचारी कौतुकास पात्र असून त्यांच्यातील शिस्त आणि अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आज अनुभवातून मिळाला असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर समता शाखेच्या ग्राहक सुनीता श्रीराम दुगल यांनी काढले आहे.

समता पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत २१ जानेवारी रोजी सुनिता दुगल एम.एस.सी.बी.चे वीज बील भरण्यासाठी शाखेत आल्या असता त्याच्या जवळ असणारी ३० हजाराची रक्कम विसरून शाखेतच राहिली.श्रीरामपूर शाखेच्या शिपाई कर्मचारी रंजना लोंढे यांना ती रक्कम सापडली,त्यांनी ती रक्कम शाखाधिकारी फारुख शेख यांच्याकडे दिली.त्यांनी चौकशी करून ती रक्कम सुनिता दुगल यांना बोलावून देण्यात आली.प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी सोपान पठारे,उपशाखाधिकारी भरत कर्णावट,कर्मचारी ग्राहक,सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व संचालक मंडळ,मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी,अधिकारी आदींनी रंजना लोंढे व सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शाबासकी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close