जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक विजेचा झटका बसून तरुण ठार,

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन इमारती नजीक असलेल्या डी. पॉल इंग्लिश मिडीयम शाळेच्या नजीक एका इसम शंकर मेणा (वय-२७)-रा.राजस्थान यास विजेचा झटका बसून तो गंभीररीत्या जखमी झाला असून त्यास नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डी.पॉल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू असून त्या ठिकाणी अनेक परप्रांतीय मजूर काम करत असून त्यातील एकास तेथे रात्री ११.३० वाजेपुर्वी वीज गेल्याने तो ती जोडण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरी नुसार आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू दप्तर नोंद क्रं. सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधित मजूर हा राजस्थानातील होता व तो तेथे फरशी बसविण्याचे काम करत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.या पूर्वीही अशीच एक घटना गत वर्षी घडली होती.

पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोने हे करीत आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार डी.पॉल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू असून त्या ठिकाणी अनेक परप्रांतीय मजूर काम करत असून त्यातील एकास तेथे रात्री ११.३० वाजेपुर्वी वीज गेल्याने तो ती जोडण्यासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close