कोपरगाव तालुका
जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्याला जागेची खरेदी,झाला निर्णय!
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभार्थ्यांच्या यादीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक कुटुंबांचा सामावेश होऊन देखील या कुटुंबांकडे स्वतःची जागा नसल्यामुळे या कुटुंबांना घरकुलासाठी मंजूर झालेला निधी परत जाणार होता याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या दालनात बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावला असून या बैठकीतच स्वत:ची जागा नसणाऱ्या घरकुलाच्या लाभार्थ्याला २०१० च्या शासन निर्णयानुसार जागा खरेदी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल मंजूर झालेल्या जवळपास १३०० कुटुंबांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत. २०१४ पासून हे कुटुंब घरकुलाला जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु एक गुंठा जागा खरेदी होत नसल्यामुळे या कुटुंबांचा घरकुलाचा प्रश्न अधांतरी होता. त्यासाठी शासन परीपत्रक क्रं.जे.१२०२५/२/२०१० नुसार दारिद्र्य रेषेखालील या कुटुंबांना गावांतर्गत जागा खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय झालेला आहे.या निर्णयांतर्गत राज्यातील ४० हजार कुटुंबांना अशी जमीन उपलब्ध करून देता येईल यात दीर्घ भाडे पट्टयाचा किंवा बक्षीस पत्राचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.यात केंद्र व राज्याचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा हिस्सा गृहीत धरला जाणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते. परंतु या कुटुंबांकडे स्वमालकीची जागा नसल्यामुळे हे कुटुंब घरकुल बांधू शकत नव्हते अशा नागरिकांची संख्या तालुक्यात मोठी होती. ज्या गावात घरकुल मंजूर आहेत त्याच गावांत घरकुल बांधणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबांना घरकुलासाठी आवश्यक असणारी जागा त्या-त्या गावातच खरेदी करायचे ठरविले तरी त्या जागेची गावांतर्गत खरेदी होत नव्हती. त्यामुळे घरकुलाचा लाभ मिळून देखील हे कुटुंब घरकुल बांधण्यापासून मागील काही वर्षापासून वंचित होते. काही लाभार्थी कुटुंबांचा तर घरकुलाचा निधीही शासनाकडे परत जाणार होता. या कुटुंबांना येत असलेल्या अडचणींची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी सोमवार रोजी सकाळी अकराच्या सुमारास तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या दालनात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील घरकुल मंजूर असलेल्या व जागेअभावी घरकुल बांधू शकत नसलेल्या लाभार्थी कुटुंबांची जागेची अडचण सोडविण्यासाठी बैठक घेतली त्या वेळी वरील शासन निर्णयानुसार निर्णय घेतला आहे.
या बैठकीसाठी पंचायत समितीच्या सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,सब रजिस्ट्रार बालाजी मादसवार,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते,राहुल जगधने, अनिल दवंगे, कृष्णा मलिक, दिलीप बोरनारे, कृष्णा वालझाडे, बाळासाहेब रोहम, साहेबराव भोसले, संजय काळे, सुदाम साबळे, साहेबराव रक्ताटे, ग्रामविस्तार अधिकारी सुनील माळी, सर्व ग्रामसेवक आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल मंजूर झालेल्या जवळपास १३०० कुटुंबांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधण्यास अडचणी येत आहेत. २०१४ पासून हे कुटुंब घरकुलाला जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. परंतु एक गुंठा जागा खरेदी होत नसल्यामुळे या कुटुंबांचा घरकुलाचा प्रश्न अधांतरी आहे. त्यासाठी शासन परीपत्रकानुसार या कुटुंबांना गावांतर्गत जागा खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी अशा सूचना केल्या. त्या सूचनांप्रमाणे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर आहे परंतु स्वतःची जागा नाही त्या कुटुंबांसाठी गावांतर्गत एक ते अडीच गुंठ्यांची खरेदीची परवानगी दिली असून या बैठकीत दोन कुटुंबांना जागा खरेदी करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरकुलापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांचा वर्षानुवर्षापासून रखडलेला जागेचा प्रश्न मार्गी लागला असून पंडीत दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत जागा उलपब्ध नसणाऱ्या लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्याचा समान हिस्सा म्हणून रुपये ५० हजार मिळणार आहे.त्यामुळे आपले घराचे स्वप्न पाहत असणाऱ्या व ज्या लाभार्थ्यांना स्वतची जागा नाही अशा लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्यामुळे या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.