कोपरगाव तालुका
आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी- चैताली काळे

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आशा सेविकांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतांना आपले आरोग्य बाधित होणार नाही याची दक्षता घेवून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
यावेळी पंचायत समितीमध्ये आयोजित आशा सेवकांच्या रांगोळी स्पर्धा विजेत्या आशा सेविका तसेच उत्कृष्ट आशा सेविकांचा चैताली काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोपरगाव पंचायत समितीमध्ये आशा दिवस निमित्त आशा सेविकांच्या गौरवार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जिल्हा परिषद सदस्या विमल आगवण,सोनाली रोहमारे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, माजी सभापती अनुसया होन, सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके,सुनीता संवत्सरकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, आरोग्य अधिकारी संतोष विधाटे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती वैशाली बडदे, डॉ.विकास घोलप, डॉ. अजिंक्य आढाव,आशा समूह संघटक, श्रीमती नीलम कानडे, रोहिदास होन, राहुल जगधने, आरोग्य सहाय्यक आर. एम. भांगे आदींसह आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाल्या कि,ग्रामीण भागतील जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आशा सेविकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आशा सेविका आपले काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छता, लसीकरण,यांचे महत्व देण्यात व समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आशा सेविका काम करीत आहेत. आशा सेविकांना विविध आजारांवर गोळ्या औषधे वाटप करावे लागत असल्याचेही त्या शेवटी म्हणाल्या आहेत.
यावेळी पंचायत समितीमध्ये आयोजित आशा सेवकांच्या रांगोळी स्पर्धा विजेत्या आशा सेविका तसेच उत्कृष्ट आशा सेविकांचा चैताली काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.