कोपरगाव तालुका
कोळपेवाडीमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्यादारी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नागरिक व शासकीय अधिकारी यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेवून जाण्यासठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्यादारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या विविध योजनांचा लाभ एकाच दिवशी, एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार असून या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
शासनाच्या अन्नधान्य सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ कल्याण योजना अशा अनेक योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी, तसेच अन्नधान्य वितरण विभाग अंतर्गत नवीन शिधापत्रिका, रेशनकार्ड मधून नाव कमी करणे अथवा समाविष्ट करणे, तसेच तहसील कार्यालयातून नागरिकांना मिळणारे विविध शासकीय दाखले यामध्ये जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला आदी दाखले मिळविण्यासाठी कागपत्रांची पूर्तता करून नागरिकांना या ठिकाणी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक, महिला व अशिक्षित लोकांना अनेक शासकीय योजानांचा लाभ घेण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणी जर अधिकारी उपस्थित असले तर या नागरिकांना कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती मिळण्यातच बराच कालावधी जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त होऊन या शासकीय लाभाच्या योजनांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे विविध योजनेच्या लाभांसाठी पात्र असून देखील अनेक नागरिक अशा अनेक योजनांपासून वंचित राहत आहेत. नागरिकाची होत असलेली अडचण ओळखून आ.आशुतोष काळे यांनी योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थी नागरिकांना अत्यंत कमी वेळात विविध योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना विविध योजनांचा सुलभपणे लाभ मिळावा या उद्देशातून हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये अन्नधान्य सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ कल्याण योजना अशा अनेक योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी, तसेच अन्नधान्य वितरण विभाग अंतर्गत नवीन शिधापत्रिका, रेशनकार्ड मधून नाव कमी करणे अथवा समाविष्ट करणे, तसेच तहसील कार्यालयातून नागरिकांना मिळणारे विविध शासकीय दाखले यामध्ये जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला आदी दाखले मिळविण्यासाठी कागपत्रांची पूर्तता करून नागरिकांना या ठिकाणी मिळणार आहे. या उपक्रमाचा कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच विविध योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रांची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात उपलब्ध असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.