कोपरगाव तालुका
कोपरगावात मटका जोरात,एकावर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात अवैध व्यवसायास उत आला असून कोपरगाव शहर पोलिसांनी मटण मार्केच्या बाजूस गांधीनगर येथील आरोपी रफिक बनेमिया सय्यद (वय-४३) रंगेहात पकडले आहे.व त्याच्याकडून रोख ०१ हजार ७८० रुपयांची रोकड,व जुगाराचे साधने असा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी गांधीनगर येथील आरोपी रफिक सय्यद हा काही इसमासह पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला कागदी चिठ्यांवर लिहून ‘लक्ष्मी मटका’ नावाचा जुगार खेळताना आढळून आलेला आहे.त्याचे विरुद्ध पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे (वय-३१) यांनी गुन्हा दाखल केला आहे.अन्य ठिकाणी वैध व्यवसायला ऊत आला असून त्याबाबत पोलिसांनी चौकशी करणे गरजेचे बनले आहे.
कोपरगाव शहरात वर्तमानात अवैध व्यावसायिकांची चलती वाढली असून गत सप्ताहात शहरातील खडकी या उपनगरात सुमारे पासष्ठ हजार रुपयांचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला होता.त्यातील प्रमुख आरोपी पकडला गेला असला तरी एक आरोपी हा फरार झाला आहे.त्याचा पोलीस शोध घेत असताना कोपरगाव शहरात पोलिसांना गप्त खबऱ्यामार्फत खाबर मिळाली की,कोपरगाव शहरातील मटण बाजाराशेजारी एका टपरीच्या आडोशाला अवैध जुगार सुरु आहे.त्या प्रमाणे कोपरगाव शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनखाली धाड टाकली असता ती बातमी खरी निघाली आहे.
त्या ठिकाणी गांधीनगर येथील आरोपी रफिक सय्यद हा काही इसमासह पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला कागदी चिठ्यांवर लिहून ‘लक्ष्मी मटका’ नावाचा जुगार खेळताना आढळून आलेला आहे.त्याचे विरुद्ध पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे (वय-३१) यांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.शहरात अन्य ठिकाणी जोरात अवैध व्यवसाय सुरु असून पोलिसांनी त्याची दखल घेणे गरजेचे बनले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३६६/२०२१ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.