जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दुचाकी चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रापंचायत हद्दीत असलेल्या नगदवाडी येथून नुकतीच आपली काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज डिस्कव्हर (क्रं.एम.एच.१७ सि.एफ.५६१९) हि दुचाकी सोनेवाडी येथील आरोपी नारायण नामदेव वायकर याने चोरून नेली असल्याची फिर्याद डोऱ्हाळे येथील निरंजन रंगनाथ गव्हाणे (वय-४२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने दुचाकी स्वारात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा दुचाकी चोर सक्रिय झाले असून त्यांनी आपली वक्र दृष्टी दुचाकीवर वळवली आहे.त्यामुळे दुचाकी मालक भीतीच्या सावटाखाली आले आहे.पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्मांण झाली आहे.या गुंह्यातील आरोपी अद्याप अटक नाही.

अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील उपवाडी असलेल्या नगदवाडी येथे दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी हे आपली दुचाकी वरील ठिकाणी लावून आपल्या कामास गेले असता तिच्यावर वक्रदृष्टि असलेल्या चोरटा नारायण वायकर याने कोणाचे लक्ष नाही हि बाब हेरून आपले चोरीचे ध्येय साध्य केले आहे.हि बाब फिर्यादी हे घटनास्थळी आल्यावर त्यांच्या लक्षात आली आहे.त्यांनी या प्रकरणी आपली फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४३५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close