कोपरगाव तालुका
कोपरगावातील सेवानिवृत्त सैनिकांच्या समस्या आपण अग्रक्रमाने सोडवू-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशाच्या संरक्षणात सैनिकांची महत्वपूर्ण भूमिका आहेच पण माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी हाही महत्वपूर्ण घटक आहे.तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा आपल्याला सार्थ अभिमान असून त्यांच्या समस्या आपण अग्रक्रमाने सोडवू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावातील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
सदर प्रसंगी शांतीलाल होन यांनी साई संस्थान मध्ये सेवा बजावत असलेल्या निवृत्त सैनिकांना अकुशल स्रेणीतून कुशल स्रेणीत समाविष्ठ करावे असे आवाहन केले आहे.
सन-१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातून बांगलादेशाचा जन्म झाला त्याला पन्नास वर्षे झाली असून त्या निमित्त कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ज्या वीर जवानांनी आपले अतुल्य योगदान दिले त्या वीर जवान व वीर माता यांचा सन्मान आज आ.आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.सदर प्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगूले,सुनील शेलार,नगरसेवक मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,महात्मा गांधी प्रदर्शनचे विश्वस्त धरमचंद बागरेचा,अड.योगेश खालकर,अशोक आव्हाटे,रमेश गवळी,अर्जुन शिंदे,युवराज गांगवे,पंढरीनाथ शिंदे,मुकुंद चव्हाण,तुकाराम रनशूर,मधुकर इनामके,भाऊसाहेब निंबाळकर,श्रीमती अंकिता भोसले,दशरथ साळवे,बाळासाहेब वाघ,अनिल निंबाळकर,बाळासाहेब रनशूर,सचिन चोळके,भाऊसाहेब शेजुळ,श्रीमती अहिल्याबाई पगारे,शकुंतला उर्हे,विलास वारे,सुशीला शिंदे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी त्यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच सैनिक भवन यास जागा देऊ व ते स्थानिक निधीतून बांधून देऊ असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सेवा निवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल होन यांनी केले तर उपस्थितांना मारुती कोपरे,अड.योगेश खालकर यांनी मार्गदर्शन केले.तर सूत्रसंचलन यांनी केले तर उपस्थितांनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार युवराज गांगवे यांनी मानले आहे.सदर प्रसंगी आ.काळे यांच्या हस्ते उपस्थित वीर जवानांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला आहे.त्यावेळी बहू संख्येने नागरिक उपस्थित होते.सदर प्रसंगी शांतीलाल होन यांनी साई संस्थान मध्ये सेवा बजावत असलेल्या निवृत्त सैनिकांना अकुशल स्रेणीतून कुशल स्रेणीत समाविष्ठ करावे असे आवाहन केले आहे.