जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात अवैध गुटखा विक्री,दोन जणांवर गुन्हा एकास अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य सरकारने तरुण पिढी गुटक्यापासून अलग करण्यासाठी राज्यात गुटखा बंदी करूनही कोपरगावात काल दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास खडकी उपनगरातील आरोपी सचिन विजय कटाळे (वय-३०) व शेरखान पठाण रा.कोपरगाव यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

दरम्यान अवैध गुटख्याप्रश्नी दोन वर्षांपूर्वी कोपरगाव बस स्थानकाजवळ दक्षिण बाजूस असललेल्या कोपऱ्यावर असललेल्या रिक्षा वजा टपरीत नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला होता.मात्र त्याबाबत गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत सोयीस्कर मौन पाळले होते.यात तोच प्रमुख आरोपी असल्याचे बोलले जात आहे.या ठिकाणी लाखो रुपयांची अवैध विक्री होत असल्याचे त्या वेळी नागरिक बोलत होते.कोपरगावात या व्यवसायात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा समाना करावा लागतो.तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यासह तंबाखूजन्य सुपारी,पानमसाला याची निर्मिती आणि विक्री करण्यास बंदी घातली.या निर्णयाला नऊ वर्षे उलटली,मात्र कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून गुटखा निर्मितीसह विक्रीही सुरूच आहे.अवैध गुटखा विक्रीकडे लक्ष वेधण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मार्च २०१८ मध्ये अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची राजरोस विक्री सुरूच कशी राहते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देताना तत्कालीन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी गुटखा विक्रीची चौकशी दक्षता पथकांमार्फत करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आता राज्यात महा आघाडी सरकार विराजमान आहे.तर सत्तेत असणारे भाजप आज विरोधी पक्षात आहे.मात्र आरोप करणाऱ्यांच्या राज्यात वर्तमानात आज गुटखा विक्री राजरोस सूरु असल्याचे कोपरगाव तालुक्यात चित्र आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी खडकी उपनगरात सप्तशृंगी मंदिराच्या जवळ खडकी प्रभाग क्रमांक-१ येथे नुकतीच एका गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्या ठिकाणी जवळपास ६७ हजार २२० रुपयांचे घबाड सापडले आहे.

त्यात ४५ हजार १२० रुपयांचा हिरा पान मसाल्याच्या १२० रुपये किमतीचे ३७६ पुडे,१० हजार ९८० रुपयांचे प्रत्येकी ३० रुपये किमतीचे ३६६ पुडे,७ हजार ९२० रुपयांचे १९८ प्रति पुडा असे ४० पुडे,०१ हजार ६०० रुपये किमतीचे सुगंधी विमल पान मसाल्याचे प्रत्येकी किंमत २०० रुपये असे ४० पूडे,०१ हजार ६०० रूपये किमतीचे गोवा १००० चे प्रत्येकी २०० रुपये किमतीचे ८ पुडे असे एकूण ६७ हजार २२० रुपयांचा ऐवज शहर पोलिसांनी जप्त केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी एक आरोपी जेरबंद केला आहे.

या प्रकरणी आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.क्रं.३६५/२०२१ भा.द.वि.कलम १८८,२७२,२७३,३२८,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close