कोपरगाव तालुका
मंजूर बंधाऱ्याचे प्रस्ताव तयार करा-आ.आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महापुरामुळे नुकसान झालेल्या मंजूर बंधाऱ्याचे सर्वेक्षण करून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभाग, रेल्वे विभाग, जलसंधारण, जल निस्सारण विभाग, सार्वजनिक बाधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेवून या अधिकाऱ्यांना विविध विकासकामांचे मागील पाच वर्षापसून प्रलंबित असलेल्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने तयार करण्यास सांगितले असून यामध्ये महापुरामुळे नुकसान झालेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आ. आशुतोष काळे यांनी भूमिका घेतली आहे.
महापूरामुळे मंजूर बंधाऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होवून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मंजूर बंधाऱ्याचे नुकसान झाल्यामुळे मंजूर परिसरातील शेतीचे भवितव्य धोक्यात आले असून त्यासाठी मंजूर बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम होणे गरजेचे आहे. तसेच महापूरामुळे नुकसान झालेल्या ज्या नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा नुकसानग्रस्त नागरिकांची माहिती सादर करून नुकसानभरपाई मिळणे बाबत प्रस्ताव तयार करा-आ. काळे
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभाग, रेल्वे विभाग, जलसंधारण, जल निस्सारण विभाग, सार्वजनिक बाधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेवून या अधिकाऱ्यांना विविध विकासकामांचे मागील पाच वर्षापसून प्रलंबित असलेल्या विकास कामांचे प्रस्ताव तातडीने तयार करण्यास सांगितले असून यामध्ये महापुरामुळे नुकसान झालेल्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आ. आशुतोष काळे यांनी भूमिका घेतली आहे.
या बैठकीसाठी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, जलसंधारण, जल निस्सारण विभागाचे उपअभियंता पावटेकर, रेल्वे विभागाचे अधिकारी मीना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यलई आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत आ. काळे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा जाणून घेतला. कोपरगाव विधानसभा मतदार संघात ज्या-ज्या गावात जलसंधारण योजने अंतर्गत कामे होवू शकतात त्या गावांचे नवीन प्रस्ताव तयार करा. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नवीन कोपरगाव-रोटेगाव महामार्गाचे सुरु असलेल्या रेल्वे मार्गाच्या कामाची सद्यस्थितीची माहिती घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात रेल्वे क्रॉसिंगजवळ ज्या ज्या ठिकाणी बोगद्यांचे सुरु आहेत हि कामे तातडीने पूर्ण करावी. बोगद्याच्या परिसरात पथदिवे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून शेड बांधावे व बोगद्यात पाणी साचून वाहनचालकांना व नागरिकांना त्रास होवू नये यासाठी पंपिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कोपरगाव मतदार संघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांची सद्यस्थिती व प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची माहिती आ.काळे यांनी घेतली आहे.