जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या साठवण तलावासाठी नगरविकास राज्यमंत्री ना.तनपुरे सकारात्मक-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेसाठी भविष्यात पाण्याची तहान भागविण्यासाठी अहंम भूमिका निभावणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावाच्या निधीसाठी आपण सर्व ते सहकार्य करू असे आश्वासन राज्याच्या नगरविकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतेच दिले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच क्रमांकाचा साठवण तलाव लवकरात लवकर पुर्ण व्हावा यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने आपण व कोपरगावचे आ.आशुतोष काळे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी पाठपुरावा करत असून त्यास सुनील गोर्डे,शहर अभियंता डी. एस.वाघ,कु.पाटील आदी मान्यवर सातत्याने साथ करत आहेत.काल आपण नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचेशी पाच क्रमांकाच्या साठवण तलावाबाबत सविस्तर चर्चा केली आहे.ना.तनपुरे यांनी हा विषय काळजीपूर्वक समजावून घेतला असून अतिशय आत्मीयतेने या तलावाच्या कामाची माहिती घेतली.आताचे साठवण तलाव वर्तमान काळात अपुरे पडत असल्याने पाच क्रमांकाच्या तलावासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक बनले आहे. या बाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली.आ.आशुतोष काळे हे याच विषयासाठी आपणास भेटून गेले असल्याचे स्मरण ना.तनपुरे यांनी करून दिले.साठवण तलाव व त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करणेकमी ना.प्राजक्त तनपुरे नक्कीच सहकार्य करतील असा आशावाद अध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगावच्या माजी लोकप्रतिनिधींनी राजकिय अडथळे आणले नसते तर पाच क्रमांकाचा साठवण तलाव मागील वर्षीच पूर्ण झाला असता असा ठपका ठेवत त्यांनी आपण म्हणजे वहाडणे यशस्वी झाले तर आपले राजकिय भवितव्य धोक्यात येईल अशा संकुचित विचारांमुळेच शहराला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले असल्याचा आरोपही त्यांनी शेवटी माजी.आ. कोल्हे यांचे नाव न घेता केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close