जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात विषय समित्या निवडीत वरिष्ठांच्या आदेशाला दाखवला ठेंगा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या आज दुपारी संपन्न झालेल्या विषय समिती सभापती व सदस्य निवडीत सात समित्यांपैकी भाजपला चार व सेनेला दोन विषय समित्या मिळाल्या असल्या तरी राज्यात व नगर जिल्हा परिषदेत ज्या प्रमाणे महाआघाडी झाली तिची पुनरावृत्ती होणे अपेक्षित असताना कोपरगावात मात्र सेनेचा एक गट भाजपच्या कच्छपी लागल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा घातला गेला असून महाविकास आघाडीचा कोपरगावात बट्ट्याबोळ झाल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे कोपरगाव सेनेत अद्यापही दोन गट कार्यरत असल्याचा चुकीचा संदेश राज्यभर गेला आहे.

या संबंधी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुक्याचे सेनेचे संपर्क प्रमुख अनिल महापंकर यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी,” अत्यंत दुःखद अंतकरणाने या कृतीबाबद नाराजी व्यक्त करून आपण या बाबत जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख यांचेशी संपर्क साधून त्यांना राज्यातील महाआघाडीचाच प्रयोग कोपरगावात होणे अपेक्षित असल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे सांगितले असल्याचे” विधान केले असल्याने हा स्थानिक पातळीवरच घोळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असं की,कोपरगाव नगरपरिषदेची विषय समित्यांची मुदत नुकतीच संपली होती.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डी येथील प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांची नियुक्ती केली होती.त्यांनी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात आज विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकां समोर हि धक्कादायक बाब उघड झाली आहे.

या बाबत सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांचेशी संपर्क साधला असता,”त्यांनी आपल्याला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी संपर्क केला असल्याचे मान्य करून आपण वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे सर्वांना याची कल्पना देऊन महाआघाडीचेच पालन करण्याची स्पष्ट कल्पना दिली होती.त्यांनी आपण कोल्हे गटाला सोडू शकत नसल्याचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांचे मार्फत सांगितले आहे.आपल्याला सेनेच्या दुसऱ्या गटाने प्रतिसाद दिला नाही”आपण या बाबत संपर्क प्रमुख अनिल माहापंकर याना तसे सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे”.

यावेळी सात समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यात विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष) यांची पदसिद्ध सभापती म्हणून स्थायीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे तर उपसभापती उपाध्यक्ष योगेश तुळशीराम बागुल (शिवसेना कोल्हे समर्थक) यांचीही पदसिद्ध सभापती म्हणून नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे.तर तर अन्य सभापतींची नावे व गटाचे नाव कंसात दर्शवले आहे.अनिल विनायक आव्हाड, (शिवसेना कोल्हे समर्थक)सभापती, स्वच्छता व वैद्यकीय व आरोग्य सभापती,श्रीमती ताराबाई गणपत जपे,(कोल्हे-भाजप) सभापती,महिला व बालकल्याण, आरिफ करीम कुरेशी,(कोल्हे-भाजप) सभापती,सार्वजनिक बांधकाम,स्वप्नील शिवाजी निखाडे,(कोल्हे-भाजप)सभापती,पाणीपुरवठा व जलनि:सारण, मंगल बाळासाहेब आढाव (कोल्हे-भाजप) सभापती, शिक्षण,दीपा वैभव गिरमे (कोल्हे-भाजप) सभापती महिला व बालकल्याण.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने सेनेचे कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेश बागुल यांचेशी संपर्क साधला असता,”त्यांनी आपल्याला वरिष्ठ नेत्यांकडून असा कोणताही आदेश नसल्याचे सांगून स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे आदेश” असल्याचे सांगून आपली बोटे सोडवून घेतली आहेत.या दरम्यान सुभाषनगर भागातील सेनेच्या झावरे गटाच्या महिला नगरसेविका व सेनेचे गटनेते यांच्यात समितीत घेण्यावरून वादावादी झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आली आहे.

स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती पदी विजय वहाडणे यांची तर अन्य विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असून उपाध्यक्ष योगेश बागुल हे पदसिद्ध नियोजन व विकास समितीचे सभापती असून ते स्थायीचे पदसिद्ध सभापती असून अन्य समित्यांचे सभापती हे हि पदसिद्ध सदस्य असून असे सात पदसिद्ध सदस्य असून अन्य तीन सदस्यांमध्ये रवींद्र नामदेव पाठक,(कोल्हे-भाजप), ऐश्वर्याताई संजय सातभाई, (सेना-कोल्हे समर्थक) तर राष्ट्रवादीचे मंदार पहाडे या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक यांची वर्णी लागली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली असता नामनिर्देशन पत्रावर सूचक,अनुमोदक यांच्या सह्या असल्याने ते आलेले अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.माघारीच्या दिलेल्या मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे यांना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सहाय्य केले आहे.निवडणूक शांततेत पार पडली आहे.

दरम्यान या विषय समित्यांच्या निवडणुकीत राज्यस्तरावरील महाआघाडीचा प्रयोग व्हावा या साठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले हे प्रयत्नशील होते त्यांनी सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख सनी वाघ,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,विधानसभा संपर्कप्रमुख अस्लम शेख यांच्याशी पत्रव्यवहार करून हि महाआघाडी वास्तवात यावी यासाठी मोठे प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close