कोपरगाव तालुका
संवत्सर-कान्हेगाव रस्ता दुरुस्त करा-ग्रामस्थांची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर ( वार्ताहर )
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या संवत्सर – कान्हेगाव रस्ता वर्तमान काळात अत्यंत खराब झाला असून त्याची दुरुस्ती गोदावरी बायोपारेशनच्या केमिकल कंपनीने करून द्यावी अशी मागणी संवत्सर ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेत नुकतीच करण्यात आली आहे.
संवत्सर ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी शनि मंदिराच्या प्रांगणात ग्रामसभा आयोजित केली होती त्यावेळी ही मागणी करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच विवेक परजने होते.
सभेत प्रथम गावातील, देशातील, राज्यातील जवान, राजकीय कार्यकर्ते, दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली देण्यात आली. सभेत ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत अहिरे यांनी मागील सभेचे अहवाल वाचन केले व पुढील शासकीय कामे करावयाची ग्रामसभेस माहिती दिली. या ग्रामसभेत कानेगाव संवत्सर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना रस्ता, संवत्सर रेल्वे स्टेशन बंद पडलेले असून सुमारे दोन वर्ष झाले ते पूर्ववत चालू करण्यासाठी तसेच गावातील मंदिरे नवीन करण्यासाठी व विविध शासकीय कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी खासदार सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांना विनंती करण्यात येईल की ही कामे मार्गी लावण्यास मदत करावी. शिवाय निधी उपलब्ध करून द्यावा. वाड्या वस्त्या व गावातील अंतर्गत रस्त्यासाठी निधी कसा आणता येईल शिवाय कोपरगाव स्टेशन ते संवत्सर गावापर्यंत मंजूर झालेला आमदार निधीचा रस्ता खराब झालेला असून तो रस्ता त्वरित करावा या रस्त्याचे उदघाटन माजी आमदार यांनी केले होते आता उदघाटन बोर्ड गायब झाला असून तो त्वरित करावा अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील तसेच शेती महामंडळाच्या जागेत राहत असलेल्या लोकांसाठी रस्ते व्हावे शेती महामंडळ ते होऊ देत नाही ते व्हावे यासाठी महामंडळाकडे प्रयत्न करण्यात यावे तसेच राहण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीने पिके वाया गेली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांच्या पीक विम्याचे व अनुदानाचे पैसे अद्याप मिळाले नसून ते शेतकऱ्यांना मिळावे तसेच शेतकऱ्यांची वीज बिल माफी द्यावी, गोदावरी कालव्याचे आवर्तन वेळेवर मिळावे, अडीच किलोपर्यंत पाणी जाईल हा नियम बंद करून पुंछ पर्यंत न्यावे 15 व 16 सालातील रब्बी पिकाचे विमा व अनुदान मिळाले नसून त्यासाठी काही कोर्टमध्ये गेलेले असले तरी आता ते सत्ताधारी झाले असून त्यांनी ते मिळवून देण्याचे प्रयत्न करावे चालू हंगामात हरभरे ज्वारी पिक खराब हवामानामुळे पिके गेल्याचा विमा द्यावा. रामसिंग बाबा ते लक्ष्मणवाडीचा उर्वरित राहिलेल्या रस्ता लवकर आमदार कोट्यातून पूर्ण करावा याप्रसंगी आमदार आशुतोष काळे हे आमदार झाल्या बद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अहिरे यांनी पीएम किसन योजनेची माहिती दिली त्यांची नावे वाचण्यात आली ज्यांचे आधार लिंक नाही अशांनी आधार लिंकिंग हे सीएमसी किंवा ग्रामपंचायत मार्फत करावे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम योजना, आयुष्यमान भारत योजना, दुकान नोंदणी योजना, धनगर समाज गृह योजना, कागदपत्रे, जल जीवन पीक पद्धत न योजना, लोकसंख्या वाढ, पाण्याची गटार सांडपाणी योजना, तसेच नवीन चीनमधून आलेल्या कोरोना विषाणू सारख्या आजाराचे नियंत्रण, या योजनेची जनजागृती अभियान राबविणे, परजणे वस्तीशाळा वालकुंपण, महानुभव स्मशानभूमी योजना, 14 वा वित्त आयोग, वाघीनाला दलितवस्ती, अतिक्रमणे, रामवाडी लक्ष्मणवाडी
बरोबरच वाघीनाला, नऊचारी, दशरथवाडी व त्यावरील अंतर्गत रस्ते करण्यासंदर्भात गावातील राम मंदिर, काळामाथा मंदिर, रामवाडी वस्ती हनुमान मंदिर, क्रीडांगण आदी माहिती सादर करून दिली. सदर प्रसंगी चर्चेत अॅड. लोहोकणे यांनी गावाची स्वच्छता व विविध विषयावर मागणी केली. चर्चेत खंडू पाटील फेफाळे, लक्ष्मण साबळे, भरत बोरणारे, दत्तू गायकवाड, चारुदत्त गायकवाड, मधुकर साबळे, मुकुंद काळे, लक्ष्मण परजणे, महेश परजणे यांनी भाग घेतला व खेळीमेळीत चर्चा झाली. सदर प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील पद्म पुरस्कार मिळालेले पोपटराव पवार, बिजमाता राहीबाई पोपरे यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
याप्रसंगी चारुदत्त गायकवाड यांनी संवत्सर येथे सुरू करण्यात आलेल्या ग्राहक सुविधा केंद्र बाबत माहिती दिली हे केंद्र सुरु करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांची चांगली सोय झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे अॅड. खालकर. अॅड. लोहोकणे, उप सरपंच केशव भाकरे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बाराहाते, कोल्हे कारखान्याचे संचालक फकीरराव बोरनारे, बापू बाराहाते, संभाजी शेटे, चंद्रकांत लोखंडे, डॉक्टर घोरपडे, बाबासाहेब परजणे, बाळासाहेब दहे, सुभाष बिडवे, बापू तिरमखे, आनंदा डरांगे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.