जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुरुशिष्य मेळावा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात १९९७ च्या फळीतील गुरु-शिष्य मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावून आपला आनंद द्विगुणित केल्याचे अनुभवयास मिळाले आहे.

आपल्या जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ हा पर्वकाल सांगितला आहे.

सुप्रसिध्द गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहेत.‘गुरुबिन कौन बतायें ‘बाँट’ हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सदगुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सदगुरुंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वत:हूनही त्याला शोधत येतात. गुरु आणि शिक्षक यांच्यात भेद आहे, त्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहे. शिक्षकाचे शुल्क दिले की, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतो; पण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरूंसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असते. लहानपणी आईवडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण कितीही केले, तरी ते थोडेच असते, तसेच हेही आहे.नेमकी याची जाणीव ठेवून कोपरगावातील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या १९९७ च्या तुकडीने आपल्या गुरुजणांना व सग्या सोबत्यांना एकत्र करून आपल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्याची पर्वणी साधली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सदर प्रसंगी या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात,शाळेचे मुख्याध्यापक श्री काकळीज, प्रवीण ढवण, विलास वाकचौरे, बाबासाहेब निर्मळ, सतीश पेटकर,शहाजी सातव, काशिनाथ लव्हाटे, कर्ण मकुने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.योगेश लाडे, विजय कुहिले, यांनी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड करून आदरांजली वाहिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.वैभव गवळी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजय उगले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कपिल चौधरी, अभिजित शिरोडे, सादिक पठाण,आदींनी परिश्रम घेतले.सागर निर्मल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close