कोपरगाव तालुका
निर्दयपणे गोवंश वाहतूक,कोपरगाव शहर पोलिसांनी केला तीन लाखांचा ऐवज जप्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातून अवैध रित्या महिंद्रा पिकअप (क्रमांक एम.एच.०४, इ.एल. ८३२) मधून गोवंश घेऊन कोपरगाव बेटातून जात असंल्याची खबर खबऱ्याकडून पोलिसांना मिळाल्यावरुन कोपरगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा बैल व गाडीसह २ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करून राहाता तालुक्यातील ममदापुर येथील आरोपी शाहरुख अन्वर शहा (वय-२५) याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शासनाने गाय, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांच्या कत्तलीस प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम राज्यात ४ मार्च २०१५ पासून लागू केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरंगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार कोपरगाव शहरातून गोवंश वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप जाणार असून खबर पक्की असल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावर पाळत ठेवावी असता नेमकी हि चारचाकी गाडी या रस्त्याने बैलांना घेऊन निर्दयपणे आपल्या गाडीत कोंबून जात असताना त्याला कोपरगाव बेटांतील कोपरगाव ते पुणतांबा या रस्त्यावर कोपरगाव रस्त्यावर दुपारी साडे बाराच्या सुमारास एक पिकअप आढळून आली. पोलिसांनी त्यास थांबण्यास इशारा केला असता त्याने आपली गाडी थांबवाली.”त्यात काय आहे अशी विचारणा केली” असता त्याने गाडीत बैल असल्याचे सांगितले त्याकडे परवाना असल्याची विचारणा केली असता त्याने नकार दिला.त्याला पोलिसानी आपली गाडी घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अंबादास रामनाथ वाघ यांनी आरोपी शाहरुख अन्वर शहा याविरुद्ध प्राणी संरक्षक अधिनियम १९७६ चे कलम ५,९ व प्राण्यास निर्दयीपणे वागवणे या कलमांनव्ये गुन्हा दाखल केला असून सहा बैल, व मॅक्स पिकअप जप्त केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.