जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी राष्ट्रीय तिरंग्याला मानवंदना दिली आहे त्यावेळी नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर कोपरगाव नगरपरिषदेत दहेगावं बोलका येथील शहिद जवान सुनील रावसाहेब वलटे यांच्या वीरपत्नी “मंगलाताई सुनील वलटे”यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे .त्या वेळी नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.तर कोपरगाव पंचायत समितीचे ध्वजारोहण सभापती पौर्णिमा जगधने यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उपसभापती अर्जुन काळे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे हे हजर होते.

या ध्वजारोहनाकडे माजी लोकप्रतिनिधींनी सत्ता जाताच पाठ फिरवल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सत्ता येईल जाईल मात्र देश आहे त्या ठिकाणीच राहणार आहे.देश असेल तर सर्व काही मिळू शकते याची जाणीव अलीकडील काळात कमी होत असल्याबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे या पाठ फिरवण्या बाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची तथा स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.

कोपरगाव शहरात प्रजासत्ताक दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षण मंडळाचे ध्वजारोहण न.प.चे मुख्याधिकारी “श्री.प्रशांत सरोदे”यांचे हस्ते करण्यात आले. तर कोपरगाव बाजार समिती प्रांगणातील ध्वजारोहण सभापती संभाजीराव रक्ताटे यांच्या हस्ते आणि स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री.जोशी सर यांचे हस्ते करण्यात आले. भाजपा वसंत स्मृती कार्यालयाचे ध्वजारोहण रामदासजी खैरे यांनी केले आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे, कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल,गट नेते विरेन बोरावके,रवींद्र पाठक,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात,शहराध्यक्ष कैलास खैरे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी सुत्रसंचलन स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी केले आहे.खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीतील संजीवनी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी या वेळी तिरंग्याला मानवंदना दिली आहे.

यावेळी नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपला तिसऱ्या वर्षीही वेगळेपणाचा शिरस्ता राखला असून देशासाठी ज्यांनी आपला प्राण त्याग केला त्या दहेगावं बोलका ग्रामपंचायत हद्दीतील शाहिद जवान सुनील वलटे यांच्या धर्मपत्नी मंगलाताई वलटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या कुटूंबाला हा सन्मान प्रदान केला आहे.तर माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी या दिवसाचे औचित्य साधत आपली स्वच्छता मोहीम तीव्र करत आपली सायकल सजवून तहसीलदार कार्यालयात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी आपल्या स्वच्छता मोहोमेचे नुकतेच २५० आठवडे पूर्ण केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या ध्वजारोहनाकडे माजी लोकप्रतिनिधींनी सत्ता जाताच पाठ फिरवल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सत्ता येईल जाईल मात्र देश आहे त्या ठिकाणीच राहणार आहे.देश असेल तर सर्व काही मिळू शकते याची जाणीव अलीकडील काळात कमी होत असल्याबद्दल जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे या पाठ फिरवण्या बाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close