जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

४३ कोटींची कोपरगाव पाणी योजना,वितरण व्यवस्था तपासणी करणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासाठी तत्कालीन शिवसेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी तत्कालीन नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांच्या मागणीनुसार केंद्रातून ४२ कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली मात्र या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेची हैड्रॉलीक तपासणी न करताच बिल अदा केले आहे.केली नाही त्याची तपासणी आगामी एक महिन्यात करून देऊ असे आश्वासन नुकतेच दिल्याने त्यांनी आपले,”ढोल बडाव आंदोलन” मागे घेतले आहे.त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

“येसगाव साठवण तलाव ते जलशुद्धीकरण प्रकल्प या दरम्यान ४२ टक्के पाणी गळती होतेच कशी ? कोपरगाव पालिका १६ द.ल.घ.फुटाची पाणी पट्टी भरते प्रत्यक्षात केवळ ९ द.ल.घ.फूट पाणी घेते.मग पालिका जास्तीची पाणीपट्टी का भरते ?-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते.

कोपरगाव शहरासाठी तत्कालीन शिवसेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी तत्कालीन नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई,व संजय सातभाई यांच्या मागणीनुसार केंद्रातून ४२ कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली.या योजनेतून साठवण तलाव यापासून जलवाहिनी टाकून गळती कमी करणे अपेक्षित होते.त्या नंतर जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.त्यातून शहरातील सदोष वितरण व्यवस्था सुरळीत करणे अपेक्षित होते.मात्र त्या पातळीवर मात्र नेते आणि ठेकेदार यांच्यात प्रारंभीच टक्का घेण्यावरून वाद झाला होता.त्यात अखेर दोन्ही गडावरील मातबरांनी चार-चार टक्का मलिदा लाटला गेला असल्याचे बोलले जात अहोते.त्या बद्दल तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. उरले सुरले ठेकेदार आणि पदाधिकारी आणि नगरसेवक यांची अभद्र युती निर्मांण झाली आहे.त्यातून या योजनेची वाट लागली गेली आहे.शहराच्या वाट्याला पाणी मिळणे हि बाब कोसो दूर राहिली.आजही शहरातील जनतेची फरफट संपलेली नाही.उलट वितरण व्यवस्था सुरळीत केली असती तर शहराला पाणी कमी नव्हतेच आजही नाही.तरीही आगामी काळात संपन्न होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत निळवंडेच्या फुकट खिरीची वाटी पुढे केली गेली आहे.त्यातून निवडणुकांचा फड रंगीविण्याचा डाव रंगला आहे.भाजप राजवटीत तर त्यांच्या त्या नवटंकीने कहर केला.थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण करून त्यांच्या तोंडी निळवंडे घातले गेले व वदवून घेतले.त्यातून नगरपरिषद व विधानसभा निवडणुकीची आपली भूक भागवून घेतली होती.या वेळीही त्याच योजनेचे गाजर दाखवले गेले आहे.या पार्श्वभूमीवर संजय काळे यांनी आंदोलन करून कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गोसावी यांनी हे आश्वासन दिले आहे.

“या योजनेच्या किती जलवाहिन्या व कोणत्या गल्लीत कोणत्या जलवाहिन्या,किती मी.मी.च्या त्या टाकल्या आहेत.टाकल्या आहेत.किती बाकी आहेत.याबाबत आपण सन २०१५ पासून आपण मागणी करत आहोत.मात्र प्रशासन आपल्याला ती माहिती द्यायला तयार नाही.याचा अर्थ माहिती नाही दुसरा अर्थ ती टाकलीचं नाही व बिल अदा केले आहे असे म्हणण्यास वाव आहे”-संजय काळे,कोपरगाव.

सदर प्रसंगी संजय काळे यांनी या योजनेच्या किती जलवाहिन्या व कोणत्या गल्लीत कोणत्या जलवाहिन्या,किती मी.मी.च्या त्या टाकल्या आहेत.टाकल्या आहेत.किती बाकी आहेत.याबाबत आपण सन २०१५ पासून आपण मागणी करत आहोत.मात्र प्रशासन आपल्याला ती माहिती द्यायला तयार नाही.याचा अर्थ माहिती नाही दुसरा अर्थ ती टाकलीचं नाही व बिल अदा केले आहे असे म्हणण्यास वाव आहे.
येसगाव साठवण तलाव ते जलशुद्धीकरण प्रकल्प या दरम्यान ४२ टक्के पाणी गळती होतेच कशी ? कोपरगाव पालिका १६ द.ल.घ.फुटाची पाणी पट्टी भरते प्रत्यक्षात केवळ ९ द.ल.घ.फूट पाणी घेते.मग पालिका जास्तीची पाणीपट्टी का भरते ? असा कडवट सवाल केला आहे.यातून जनतेला चोवीस तास पाणी मिळायला हवे यावर मुख्याधिकारी यांनी सहमती दर्शवली आहे.व आगामी काळात हे पाणी मिळावे असे आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.दरम्यान ठेकेदार याचे पाणी योजना पूर्णत्वास जाईपर्यंत पंधरा टक्के अनामत रक्कम मागे ठेवायला हवी होती ती ठेवली की नाही ?त्या बाबत माहिती द्यावी त्यावर मुख्याधिकारी यांनी ती चार टक्के असावी अशी माहिती दिली आहे.

त्यावेळी मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे की,”आपल्याला शहराला चोवीस तास पाणी मिळावे असे आपले प्रयत्न असून आपल्याला आंदोलन करायला लावले हीच मोठी चूक आहे.तुम्ही जनहिताचे काम करत आहे.तुम्ही आम्हाला मदत करत आहात.त्यामुळे त्याची दखल घ्यायलाच हवी”त्यांनी सदर प्रसंगी ठेकेदार मुंडे यांना दुरध्वनी करून थेट संपर्क साधला व मोठ्या आवाजात संवाद साधला व उपस्थितांना ऐकवला आहे.त्यात ठेकेदारांनी,”आपण आगामी वीस दिवसात नकाशासह हि माहिती पुरवितो.आगामी दोन-तीन दिवसात जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त अभियंत्यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरु करतो व विना दबाव सर्व माहिती देतो” असे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे.त्या नंतर सम्यक काळे यांनी आपले आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली ती एक महिन्यात माहिती देणार या बोलीवर आपले आंदोलन स्थगित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close