जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी ३.८४ कोटींचा निधी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २.८४ कोटी व लेखाशीर्ष ३०.५४ अंतर्गत तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी असा ३.८४ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध राज्यमार्गावर असलेल्या पुलांवर पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन या गावांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे या गावातील नागरिक, शेतकरी, दुग्धव्यवसायिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पुलांच्या दुरुस्तींची कामे व्हावीत अशी या गावातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत आ. काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी निवडून येताच पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळून या पुलांच्या नूतनीकरणासाठी तब्बल २.८४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यमार्ग ६५ वरील कोपरगाव, उक्कडगाव, वैजापूर रस्त्यावरील पढेगाव येथील पुलाचे बांधकाम करणे यासाठी १ कोटी ४४ लाख पंचावन्न हजार तसेच कोकमठाण, सडे. शिंगवे रोडवरील देवयानी डेअरी ते कोकमठाण या प्रजीमा ९९ वरील तीन पुलांच्या नूतनीकरणासाठी ८२ लाख ५० हजार रुपये व गोधेगाव, शिरसगाव, सावळगाव रोडवरील शिंगवे नाल्यावरील पुलाच्या नूतनीकरणासाठी ५७ लाख ६० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये (ग्रा.मा २६) हंडेवाडी ते पवारवाडी रस्ता १० लाख, (ग्रा.मा ८२) नाटेगाव गाव ते प्र.रा.मा. १० लाख, (ग्रा.मा ९९) कारवाडी फाटा ते मंजूर रस्ता १० लाख, (ग्रा.मा १००) रामा ७ ते सुरेगाव रस्ता १० लाख, (ग्रा.मा १०३) मढी खुर्द ते कोळगाव रस्ता १० लाख, (ग्रा.मा १०४) मढी खुर्द ते जिल्हा हद्द पाथरे रस्ता १० लाख, (ग्रा.मा ७५) करंजी ते बोकटा शिव पर्यंत २० लाख, (ग्रा.मा ५२) पोहेगाव ते वेस रस्ता २० लाख असा १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.दत्ता भरणे यांचे आ.काळे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close