जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी योजनेस सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करा-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुखसह, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, वेस-सोयगाव, मनेगाव अशा सहा गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असून या ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिल थकबाकी वाढत गेल्यामुळे हि योजना बंद पडते. या गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा यासाठी रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करावा या प्रमुख मागणीसह या योजनेच्या साठवण तलावाचे दुरुस्ती साठी निधी द्यावा, तालुक्यातील ३६ नळ पाणी पुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध करून दयावे आदी मागण्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.

युती शासनाच्या राज्य टँकर मुक्त करण्याची घोषणा केली होती त्यावेळी रांजणगाव सह सहा गावांची सुमारे नऊ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती.मात्र १९९९ साली मुदतपूर्व विधानसभा निवडणूका संपन्न होऊन त्यात युती सरकार अल्पमतात आले व राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी सरेंवादातून या टँकर मुक्ती योजनेचा गाशा गुंडाळला होता.तर कोपरगावात त्यावेळी राष्ट्रवादीचे आ. म्हणून शंकरराव कोल्हे हे निवडणून येऊन त्यांनी या योजनेला ठेंगा दाखवला होता.तशी हि योजना वीस वर्ष धूळखात पडून होती.या ग्रामपंचायती विद्युत बिल भरल्यास सक्षम नसल्याने हि योजना कायम असून अडचण व नसून खोळंबा ठरत आली होती.तीच बाब औद्योगिक प्रशिक्षण इमारतीची झाली होती.या दोन्ही योजनेला आता आ. आशुतोष काळे निवडून आल्याने चंद्रबळ लाभल्याचे मानले जात आहे.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली त्यावेळी त्यांनी या मागण्या केल्या आहे.

या बैठकीसाठी मृद व जलसंधारणमंत्री ना.शंकरराव गडाख, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च शिक्षण राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य या बैठकीस उपस्थित होते

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,नगर-मनमाड महामार्गाचे खड्डे बुजवण्यात यावे, पोहेगाव गणपती मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा आदी मागण्या केल्या आहेत.या बैठकीत पोहेगाव येथील ‘श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासाचा अनुशेष बाकी असून हा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा.माजी आ.अशोक काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरात बांधलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा. ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा तसेच हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहेगाव येथील ‘श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली असता या बैठकीत ‘श्री.क्षेत्र मयुरेश्वर’ देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close