शिवा काशिदचे बलिदान जनता कधीच विसरणार नाही-डॉ. प्रवीण महाराज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिध्दी जोहारने स्वराज्यातील पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर पर्यायाने मराठी साम्राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. शिवा काशिदांचे हे बलिदान महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही असे प्रतिपादन ह. भ. प. डॉ. प्रवीण महाराज दुशिंग यांनी कोकमठाण येथील एका कार्यक्रमात काढले आहे.
ब्रम्हलीन प. पूज्य रामदासी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या गाथा शिवशौर्याची’ या कथामालेत मार्गदर्शन करताना डॉ. दुशिंग बोलत होते. सप्ताहभर सुरु असलेल्या या पुण्यतिथि सोहळ्याचे नेतृत्व स्वतः डॉ. दुशिंग यांनी केले.
सदर प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शंकर महाराज त्रिभुवन,ओंकार महाराज पगारे, शाम महाराज शिंदे, उत्तम महाराज श्री, दोरगे महाराज,अमोल बोरणारे,भारतीताई जाधव,वैभव बोरणारे,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते अफजलखान वध आणि राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचे जिवंत देखाव्यांसह त्यांनी सांगितलेले विविध प्रसंग ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. कोकमठाणचा परिसर शिवमय झालेला दिसून येत होता.छत्रपतींच्या काळात मावळ्यांनी त्यांना दिलेली साथ स्वराज्य निर्मितीसाठी मोलाची ठरली.शूरवीर तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,शिवा काशीद,हिरोजी इंदुलकर,अशी कितीतरी नावे इतिहासाशी जोडली गेली आहे.इथली माती या शूरवीरांच्या स्पर्शाने पावन झालेली आहे.हे आपले भाग्यच आहे.असेही ते शेवटी म्हणाले.