जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत रोजगार-स्वयंरोजगार मेळावा संपन्न”

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर तरुणांनी उभे रहावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, शहर अभियान अभियानातील सामाजिक कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराची उपलब्धता घटका अंतर्गत शहरातील दारिद्र्य रेषेखालील, सामाजिक आर्थिक जनगणणेतील तसेच महिला,अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक घटकातील वय वर्ष १८ ते ४५ वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.त्या योजना अंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .या प्रसंगी ज्या लाभार्थ्यांनी सदर प्रशिक्षण यशस्वी रीत्त्या पूर्ण केले आहे अशा लाभार्थ्यांना प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहे-मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष व साई गुरुकुल कॉम्पुटर एजुकेशन कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार-स्वयंरोजगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे,औरंगाबाद येथिल क्षेत्रिय समन्वयक श्री.झाल्टे, दी.अं.यो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे तांत्रिक तज्ञ महारुद्र गालट व रामनाथ जाधव,प्रशिक्षक कमलेश कोते,सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
कौशल्य प्रशिक्षण यशस्वी रीत्त्या पूर्ण केले आहे अशा लाभार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपल्या आर्थिक मिळकतीसाठी उपयोग करून घ्यावा तसेच स्वयं रोजगारासाठी बँकेमार्फत पतपुरवठा मिळणे कामी शहर अभियान कक्षामार्फात शिफारस करण्यात येईल अशा पध्दतीने आपापले व्यवसाय उभारावे असे आवाहन उपमुख्याधिकारी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close