जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

निळवंडेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा किंमत चुकवावी लागेल-पं.स.सदस्य रहाणे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ज्यांनी बावन्न वर्षात निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिले तर नाही खोटे भूमीपूजने केली या उलट निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात व रस्त्यावरील लढाई करून हे पाणी मिळवले असताना कोपरगाव शहरातील मतांवर डोळा ठेऊन काही राजकीय नेते निळवंडे जलवाहिणीचे गाजर दाखवून शहरातील जनतेची फसवणूक करत असून त्यांनी आपले डाव बदलावे अन्यथा त्यांची किंमत पुन्हा चुकवावी लागेल असा गंभीर इशारा कोपरगाव पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी नुकताच बहादरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.

“कोपरगावकरांना पाणी मुळीच कमी नाही केवळ साठवणूक करण्याचे साधन नाही हे वास्तव आहे.तसे कागदपत्रे बोंब मारून सांगत आहे.मात्र आता आ.काळे यांनी कोपरगाव शहराचे खरे दुखणे दूर करण्यास प्रारंभ केला आहे.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून,”ज्या नेत्यांनी या आधी या उलट उद्योग केले त्यांचा बहादरपूर व परिसरातील जनतेने विरोध व निषेध करून जागा दाखवून दिली आहे.आम्ही चांगल्या निर्णयाचे कौतुक करतो तर वाईट कामांचा निषेधही करतो त्यातून माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना या भागात त्यांना मोठा फटका बसला होता.व विधानसभेत आपटी खावी लागली होती हे विसरू नये”-बाळासाहेब रहाणे,सदस्य कोपरगाव पंचायत समिती.

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे गावठाण चौक ते दशक्रिया विधी घाट रस्त्याचे खडीकरण करणे तसेच अंजनापूर येथे गावठाण ते प्रभात डेअरी रस्ता डांबरीकरण करणे,गव्हाणे घर ते ज्ञानदेव गव्हाणे घर रस्ता डांबरीकरण करणे व अंजनापूर ते बहादरपूर शिवरस्ता खडीकरण करणे आदी विकासकामांचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,राहुल रोहमारे,गंगाधर रहाणे,अड्.योगेश खालकर,नरहरी रोहमारे,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,कौसर सय्यद,सिकंदर इनामदार,सुधीर पाचोरे,राजेंद्र पाचोरे,उत्तमराव कुऱ्हाडे,बहादरपूरचे उपसरपंच गोपीनाथ रहाणे,आप्पासाहेब पाडेकर,कैलास गव्हाणे,बळीराम गव्हाणे,भास्करराव गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,पोपटराव गव्हाणे,आकाश गव्हाणे,पर्वत गव्हाणे,सरपंच कविता गव्हाणे,संतोष वर्पे,आदी मान्यवरांसह बहादरपूर व अंजनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”निळवंडे कालव्याच्या कामाला प्रस्थापित नेते आपल्या हयातीत पिंडाला कावळा शिवत नाही तसे शिवले नाही.अखेर या व्यवस्थेवरील व नेत्यांवरील विश्वास उडाल्याने निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत लढा सुरु केला व कालवा समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,व अध्यक्ष रुपेंद्र काले,यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा लढा सुरु केला आहे.व त्यातून उच्च न्यायालयाच्या आदेशाने निधीची तरतूद करून पोलिसांना घेऊन हे काम सुरु केले आहे.आगामी जून मध्ये हे पाणी या भागात खेळणार आहे.असे असताना काही नेत्यांनी भाजपचा मुखवटा परिधान करून आपली काँग्रेसी संस्कृती भाजपवर लादली असून त्यांनी आपला खरा चेहरा दाखविण्यास सुरुवात केली आहे.त्यातून आपल्या उद्योगांची पाण्याची भूक भागविण्यासाठी पाणी नेण्याचे षडयंत्र आखले आहे.त्याला शहरवासीयांनी बळी पडू नये.कोपरगावकरांना पाणी मुळीच कमी नाही केवळ साठवणूक करण्याचे साधन नाही हे वास्तव आहे.तसे कागदपत्रे बोंब मारून सांगत आहे.मात्र आता आ.काळे यांनी कोपरगाव शहराचे खरे दुखणे दूर करण्यास प्रारंभ केला आहे.त्याबद्दल यांनी अभिनंदन करून ज्या नेत्यांनी या आधी या उलट उद्योग केले त्यांचा बहादरपूरच्या व परिसरातील जनतेने विरोध व निषेध करून जागा दाखवून दिली आहे.आम्ही चांगल्या निर्णयाचे कौतुक करतो तर वाईट कामांचा निषेधही करतो त्यातून माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना या भागात त्यांना मोठा फटका बसला होता.व विधानसभेत आपटी खावी लागली होती हे विसरू नये.पुन्हा या अकरा गावातील शेतकरी जागृत झाले असून त्याना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा दिला आहे.व आ.काळे यांनी कोपरगाव शहरासाठी साठवण तलावासाठी तांत्रिक मान्यता मिळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.व हे काम लवकरच मार्गी लावावे असे आवाहन केले आहे.मात्र वर्तमान आ.काळे यांनीही या भागासाठी काही केले नाही तर या भागातील शेतकरी व मतदार त्यांची परतफेड करतील असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.त्यांच्या या स्पष्टपणे बोलण्याचे दुष्काळी शेतकऱ्यांनी व निळवंडे कालवा कृती समितीने स्वागत केले आहे.

या परिसरातील विविध प्रलंबित रस्त्यांची मागणी केली आहे.त्यात बहादरपूर-पाथरे,बहादरपूर-सायाळे शिवरस्ता,बहादरपूर-जवळके,बहादरपूर-रांजणगाव देशमुख आदींसह विविध कामांचा समावेश आहे.तर उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी बहादरपूर साठवण तलावात मिळावे,वाचनालयाची इमारत बांधून मिळावी अशी मागणी केली आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कैलास गव्हाणे तर उपस्थितांना मार्गदर्शन आ.आशुतोष काळे,अड्.योगेश खालकर,राहुल रोहमारे,बाबासाहेब गव्हाणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close