कोपरगाव तालुका
कोपरगावातील ‘त्या’ जीर्ण इमारतीला प्रशासकीय मान्यता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झालेल्या दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालयाच्या इमारती मोडकळीस आल्या असून काही दिवसांपूर्वी या इमारतीचा काही छताचा भाग कोसळला असल्याचे आ.काळे यांच्या निदर्शनास आले होते.त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे वकील संघाच्या सदस्यांनी सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती त्याची दखल विधी व न्याय खात्याने नुकतीच घेतली असून प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येताच आ.काळे यांनी मतदार संघातील अनेक रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेतला होता.त्यावेळी कोपरगाव शहरातील न्यायालय परिसराची पाहणी केली असता वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालयाच्या इमारती मोडकळीस आल्या असून काही दिवसांपूर्वी या इमारतीचा काही छताचा भाग कोसळला असल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे वकील संघाच्या सदस्यांनी सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आ.काळेंकडे केली होती.
त्या मागणीची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी मागील वर्षी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदान प्रक्रियेला व विधी तज्ञांना अनंत अडचणी येत आहे.या इमारतींचे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.परंतु मार्च २०२० पासून कोविड साथीमूळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती.त्याचा विकास कामांवर प्रतिकूल परिणाम झाला होता.त्यात या कामाचा समावेश होता.मात्र अलीकडील काळात कोरोना साथ बऱ्याच अंशी कमी झाल्याने विकास कामांना गती आली होती.त्यात मुख्यमंत्र्यांनीं नुकताच या कामाचा समावेश केला आहे.त्यामुळे या जीर्ण न्यायालयाच्या इमारतीसाठी ३८ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजित पवार,विधी,न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानले आहे.