कोपरगाव तालुका
कोपरगावात…या महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर थोपटे हे होते.
दि.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
दि.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांत हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थिताना संविधानाची शपथ देत संविधानाचे महत्व विशद केले. संविधानामुळेच या देशाची एकसंधता टिकून राहिली असून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्य रुजणे आज गरजेचे असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर यांनी संविधान दिनाचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व समाजक्रांतिकारकाच्या कार्याची महती विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले.राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सतीश देबडे यांनी आभार मानले आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालायाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ.देविदास रणधीर,डॉ.माधव यशवंत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.के.दिघे,प्रा.रोहिणी डिबरे आदिंसह शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.