जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

महिलेवर बलात्कार,कोपरगाव तालुक्यातील आरोपीवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मी तुझ्याशी लग्न करतो असे गोड-गोड बोलून तिला गुजरात मधील सुरत व कोपरगावातील निवारा या उपनगरात फसवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आरोपी प्रवीण सोपान भुजाडे याने एक मे पासून वेळोवेळी आपल्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदर नवरा परागंदा असलेली महिला आपल्या सासुसोबत गत काही वर्षांपासून राहत असताना तिची मूळचा आपेगाव येथील असलेला व कोपरगावात कापड दुकान असलेल्या आरोपी प्रवीण भुजाडे याचेशी ओळख झाली. त्याच्या दुकानात ती काही दिवसापासून काम करत होती त्यातूनच दोघांची जवळीक निर्माण होऊन आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढले.व तिला लग्नाचे अमिश दाखवून शारीरिक संबंध स्थापित केले.व तिला गुजरात मधील सुरत व कोपरगाव शहरातील दीप्ती टॉवर्स येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,फिर्यादी महिला हि घरकाम करणारी असून ती मूळची नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील रहिवाशी आहे.तिचे लग्न २००८ साली आले होते.तिला नवऱ्या पासून दोन मुले आहेत.तिचा नवरा २०१७ साली अज्ञात कारणाने बेपत्ता झालेला आहे.ती आपल्या सासुसोबत गत काही वर्षांपासून राहत असताना तिची मूळचा आपेगाव येथील असलेला व कोपरगावात कापड दुकान असलेल्या आरोपी प्रवीण भुजाडे याचेशी ओळख झाली. त्याच्या दुकानात ती काही दिवसापासून काम करत होती त्यातूनच दोघांची जवळीक निर्माण होऊन आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढले.व तिला लग्नाचे अमिश दाखवून शारीरिक संबंध स्थापित केले.व तिला गुजरात मधील सुरत व कोपरगाव शहरातील दीप्ती टॉवर्स येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कोपरगाव शहरात तिला आय.डी. बी.आय.बँकेत खाते उघडून दिले.त्या खात्याचे चेक पुस्तक घेऊन त्यावर या महिलेच्या सह्या घेऊन ते स्वतःकडे ठेऊन घेतले.या खेरीज तिचे आधारकार्ड, रेशनकार्ड, गॅस कार्ड. बँकेचे पासबुक,स्वतःकडे ठेऊन या महिलेचे आठ तोळे वजनाचे दागिने बँकेत ठेवतो म्हणून घेऊन ते गहाण ठेवले.फिर्यादी महिलेच्या मुलाची शिक्षण फी भरण्याचे कारण देऊन २७ हजार रुपये उकळून त्यातील केवळ दहा हजार रुपये भरून बाकी रक्कम हडप केली.या आपदग्रस्त महिलेने लग्नाच्या अश्वासनाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण करून हाकलून दिले.अशी तक्रार या महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी गु.र.नं.१४/२०२० भा.द.वि.कलम ३७६,४२०,३२३ प्रमाणे आरोपी प्रवीण भुजाडे याचे विरुद्ध बलात्कार,फसवणूकव मारहाण केल्याचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close