जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सुनेसह तिच्या चार नातेवाईकावर वकील सासऱ्याचा चोरीचा गुन्हा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील इंदिरापथ मार्गावरील राममंदिराच्या मागील बाजूस रहिवाशी असलेले जेष्ठ वकील श्यामप्रसाद ईश्वदास देव (वय-७३) यांनी आपली सून मंजिरी शार्दूल देव,व्याहिन लताबाई गौतम जोशी,व्याही गौतम जोशी,सुनेचे मामा भूषण अनंत जोशी सर्व रा.सुभद्रानगर,कोपरगाव यांच्या विरुद्ध तीन तोळे सोन्याच्या बांगड्या,२० हजार रुपये रोख, मौल्यवान वस्तू,बँकेचे पासबुक,व महत्वाचे कागदपत्रे आदी मिळून १ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगावातील फिर्यादी वकील महाशयांनी १५ ऑक्टोबर २०१९ रोजी घटना घडली अशी फिर्याद ११ जानेवारी रोजी मध्यरात्री ११.५८ वाजता दाखल केली आहे.त्यात त्यांनी आपली सून मंजिरी देव व तिचे वडील गौतम जोशी,तिची आई लताबाई जोशी,सुनेचे मामा भूषण जोशी आदी चौघांविरुद्ध त्यांच्या मालकीच्या घरातून बॅगमध्ये असलेल्या तीन तोळे वजन असलेल्या दोन सोन्याचा बांगड्या,२० हजार रुपये रोख, व मौल्यवान वस्तू,बँकेचे पासबुक व महत्वाचे कागदपत्रे आदी १ लाख १९ हजार रुपये किमतीचे दागिने व नी चीजवस्तू घेऊन पोबारा केला असल्याची फिर्याद दाखल केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरातील राममंदिराच्या मागील बाजूस कोपरगावात हयातभर वकिली केली असलेले वकील श्यामप्रसाद देव हे आपला मुलगा,सून व अन्य कुटुंबियासंवेत राहातात. त्यांची सून मंजिरी देव व त्यांच्यात अलीकडील काळात वाकडे आले आहे.सुनेने काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात डिसेंबर महिन्यात आपल्या नवरा व सासऱ्या विरुद्ध व नवऱ्या विरुद्ध भा.द.वि.४९८ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.तो पासून ती त्या घरी राहात नसल्याचे मानले जात आहे.असे असताना या वकील महाशयांनी १५ ऑक्टोबर २०१९ रोजी घटना घडली अशी फिर्याद ११ जानेवारी रोजी मध्यरात्री ११.५८ वाजता दाखल केली आहे.त्यात त्यांनी आपली सून मंजिरी देव व तिचे वडील गौतम जोशी,तिची आई लताबाई जोशी,सुनेचे मामा भूषण जोशी आदी चौघांविरुद्ध त्यांच्या मालकीच्या घरातून बॅगमध्ये असलेल्या तीन तोळे वजन असलेल्या दोन सोन्याचा बांगड्या,२० हजार रुपये रोख, व मौल्यवान वस्तू,बँकेचे पासबुक व महत्वाचे कागदपत्रे आदी १ लाख १९ हजार रुपये किमतीचे दागिने व नी चीजवस्तू घेऊन पोबारा केला असल्याची फिर्याद दाखल केली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकारणी गु.र.नं.१६/२०२० भा.द.वि. कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.दरम्यान सुनेच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close