जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुप्त गुण विकसित करा-आ. काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाविद्यालयीन जीवनाबरोबरच सामाजिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराच्या माध्यमातून शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण विकसित करून आपले उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी अंजनापूर येथे एका कार्यक्रमा प्रसंगी नुकतेच केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तीमत्वाचा खरा विकास होत असतो. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व गुण महाविद्यालयीन युवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे.त्यामुळे या शिबिराचा अनुभव तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात मोलाचा ठरणार आहे-आ. काळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर व के.जे. सोमैय्या (वरिष्ठ) व के.बी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील अंजनापू येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, संचालक सचिन रोहमारे, एम.टी. रोहमारे, सरपंच कांताबाई गव्हाणे, उपसरपंच पोपटराव गव्हाणे, निवृत्ती गव्हाणे, जवळकेचे सरपंच थोरात,भास्कर थोरात, प्रभाकर गुंजाळ, बळीराम गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, सर्व सदस्य, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जगात आपल्या देशाकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भविष्यात युवा वर्गाला मोठी संधी आहे. युवा शक्तीला नवचैतन्य प्राप्त करून देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्तम व्यासपीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तीमत्वाचा खरा विकास होत असतो. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व गुण महाविद्यालयीन युवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे.त्यामुळे या शिबिराचा अनुभव तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात मोलाचा ठरणार आहे. त्यामुळे या शिबिराकडे शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एक संधी म्हणून पाहावे. आपल्यातील वकृत्वकला, नेतृत्व गुण दाखविण्यासाठी मिळालेली संधी सोडू नका. युवा वर्गाच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठा असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवून द्या असे आवाहन शिबिरार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ.निर्मला कुलकर्णी व प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष जाधव यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close