कोपरगाव तालुका
कोपरगावात व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी मदत करू – आ. काळे.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराला समृद्ध करण्यासाठी नवीन व्यवसाय उद्योग सुरु होणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून शहर बाजारपेठेला पूर्वीचे दिवस प्राप्त होणार आहे. कोपरगावचे व्यावसायिक कोपरगाव तालुक्याच्या बाहेर जर व्यवसाय करीत असतील तर त्यांनी आपले व्यवसाय कोपरगावमध्ये सुरु करावे व्यावसायिकांना व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली. दुबई येथील सुप्रसिद्ध व्यापारी डॉ. धनंजय दातार यांचा दुबईमध्ये व्यवसायाची सुवर्णसंधी या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
कोपरगावच्या व्यावसायिकांनी कोपरगावमध्येच उद्योग धंदे सुरु करावे त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोपरगावच्या विकासासाठी व्यावसायिकांनी पुढे यावे. कोपरगाव मध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे-आ. काळे
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, महिला आघाडी, युवक आघाडी, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन व लायन्स लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने दुबई येथील सुप्रसिद्ध व्यापारी डॉ. धनंजय दातार यांचे व्याख्यान स्व. यशवंतराव चव्हाण समता सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.दिले.याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, सुधीर डागा, अजित लोहाडे, तुळशीदास खुबानी, प्रदीप साखरे, सचिन भडकवाडे, किरण शिरोडे, मोहन झंवर, गुलशन होडे, संदीप रोहमारे, सत्येन मुंदडा, किरण दगडे, रूपाली अमृतकर आदी मान्यवरांसह कोपरगाव शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, सुधीर डागा, अजित लोहाडे, तुळशीदास खुबानी, प्रदीप साखरे, सचिन भडकवाडे, किरण शिरोडे, मोहन झंवर, गुलशन होडे, संदीप रोहमारे, सत्येन मुंदडा, किरण दगडे, रूपाली अमृतकर आदी मान्यवरांसह कोपरगाव शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांता ते म्हणाले की, कोपरगावच्या व्यावसायिकांनी कोपरगावमध्येच उद्योग धंदे सुरु करावे त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोपरगावच्या विकासासाठी व्यावसायिकांनी पुढे यावे. कोपरगाव मध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून कोपरगावमधील व्यावसायिकांच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करून व्यावसायिकांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.