कोपरगाव तालुका
पिकपने वाळूचोरी कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून शासनाची कुठलीही परवानगी न घेता विना क्रमांकाची पिकअप रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू चोरी करून रिक्षाचालक फरार करण्यास सहाय्य करणाऱ्या मच्छीन्द्र हरिभाऊ जाधव (वय-४५) व गणेश शिवाजी बढे दोघे रा.डाऊच खुर्द यांचे विरुद्ध तेथील कामगार तलाठी सुरेश बापूराव जाधव यांनी गुन्हा दाखल केल्याने डाऊच खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.
डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून महसुलाच्या वाळू उपसा प्रतिबंधक पथकास एक विना क्रमांकाची एक पिकअप वाळूचोरी करताना आढळली त्यावर कारवाई करण्यासाठी अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकातील तलाठी सुरेश जाधव हे गेले असता तेथे मच्छीन्द्र जाधव व गणेश बढे यांनी आपल्या ताब्यातील दुचाकीच्या साहाय्याने (क्रं. एम.एच.१७ सी.ई.३७५४ )हिच्या साहाय्याने त्यांना पाठलाग करण्यास अडथळा निर्माण होईल अशी कृती केली असून सदरची पिकअप पळवून लावण्यास मदत केली आहे.
गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकारी यांचे निर्बंध आहेत.तरीही काही वाळूचोर आपल्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासनाची नजर चुकवून वाळूचोरी करून पर्यावरणाची हानी करीत आहे.अशीच घटना डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली असून महसुलाच्या वाळू उपसा प्रतिबंधक पथकास एक विना क्रमांकाची एक पिकअप वाळूचोरी करताना आढळली त्यावर कारवाई करण्यासाठी अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकातील तलाठी सुरेश जाधव हे गेले असता तेथे मच्छीन्द्र जाधव व गणेश बढे यांनी आपल्या ताब्यातील दुचाकीच्या साहाय्याने (क्रं. एम.एच.१७ सी.ई.३७५४ )हिच्या साहाय्याने त्यांना पाठलाग करण्यास अडथळा निर्माण होईल अशी कृती केली असून सदरची पिकअप पळवून लावण्यास मदत केली असल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.-१०/२०२० भा.द.वि.कलम ३७९,३४१,१८६,३४ प्रमाणे वरील दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.