कोपरगाव तालुका
प्रक्रिया उद्योगातून तरुणांना भविष्यात मोठी संधी-आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारने प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेऊन त्यास अनुदान दिले असल्याने या उद्योगाला भविष्यात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
वर्तमानात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. घेतलेल्या प्रशिक्षणातून महिलांनी आपले उद्योग सुरु करावे. महिलांसाठी दरवर्षी भक्त गटाच्या महिलांसाठी गोदाकाठ महोत्सव हे व्यासपीठ उपलब्ध असून अशा व्यासपीठाचा फायदा घ्यावा प्रत्येकाला तयार पदार्थांची आवश्यकता भासत आहे. वेफर्स, रस, पेस्ट, चटणी, लोणचे, मिरची पावडर, मिरची लोणचे, डाळींबापासून थंड पेय, कांदा सुकवून त्याची पावडर करणे यादी तयार वस्तूंचे महत्त्व अतिशय वाढलेले आहे. प्रत्येकाला तयार खाद्य पदार्थ हवे असल्यामुळे त्यासाठी हवी ती किंमत मोजायला तयार आहे त्यामुळे निश्चितपणे फळ प्रक्रिया उद्योगाला अतिशय चांगले दिवस आले आहे-आ. काळे
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयात महिलांसाठी फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीरातील सहभागी महिलांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा समन्वयक उद्योजकता विकास केंद्राचे सारंग, सुधीर डागा, अशोक खांबेकर,राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, सुनील बोरा, अभिजित नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, वर्तमानात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. घेतलेल्या प्रशिक्षणातून महिलांनी आपले उद्योग सुरु करावे. महिलांसाठी दरवर्षी भक्त गटाच्या महिलांसाठी गोदाकाठ महोत्सव हे व्यासपीठ उपलब्ध असून अशा व्यासपीठाचा फायदा घ्यावा प्रत्येकाला तयार पदार्थांची आवश्यकता भासत आहे. वेफर्स, रस, पेस्ट, चटणी, लोणचे, मिरची पावडर, मिरची लोणचे, डाळींबापासून थंड पेय, कांदा सुकवून त्याची पावडर करणे यादी तयार वस्तूंचे महत्त्व अतिशय वाढलेले आहे. प्रत्येकाला तयार खाद्य पदार्थ हवे असल्यामुळे त्यासाठी हवी ती किंमत मोजायला तयार आहे त्यामुळे निश्चितपणे फळ प्रक्रिया उद्योगाला अतिशय चांगले दिवस आले असून महिलांनी फळ प्रक्रिया प्रशिक्षणातून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी शहीद जवान सुनील वल्टे यांच्या कुटुंबातील सदस्य वडील रावसाहेब वल्टे, वीरमाता सुशीला वल्टे, विरपत्नी मंगला वल्टे यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार केला. तसेच विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आयोजकांनी आ. आशुतोष काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले.