जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात एक महिला डॉक्टर कोरोना बाधित,परिसर बंद करण्यास प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील एका माध्यमिक विद्यालयातील एक कर्मचारी बाधित झालेला असल्याने त्यांच्या संपर्कातील अकरा जणांचे श्राव तपासणीसाठी पाठवले होते त्यातील पाच अहवाल पहिल्या टप्यात निरंक आले असताना सहावा अहवाल मात्र एका खाजगी महिला डॉक्टरचा असून तो बाधित आल्याचा धक्कादायक खुलासा मिळाला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेले आहे.त्यामुळे प्रशासनाने संभाजी चौकाच्या नैऋत्येस असलेला भाग सील करण्यास प्रारंभ केला आहे.

दरम्यान ठाणे येथुन दोन मुलींना घेऊन आजोबा आज आपल्या मूळ गावी धोत्रे येथे आले असता यातील मुलींचे वडील कोरोना बाधित असलेल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे तिघांना श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय मुलिंच्या वसतिगृहात कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. उद्या त्यांचे श्राव तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

कोपरगांव शहरातील एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असलेले व लोणी ता.राहाता येथील मूळ रहिवासी असलेल्या इसमाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय असे एकुण ११ व्यक्तींची रवानगी आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात केली होती व त्यांच्या श्रावांची तपासणी करण्यात आली होती.त्यांच्या पैकी आज पाच जणांचे अहवाल निरंक आले असताना एका खाजगी महिला डॉक्टर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती.तिचा अहवाल खाजगी रित्या तपासणीसाठी पाठवला होता.तो बाधित आल्याने कोपगावात खळबळ उडाली आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी पुन्हा धसका घेतला आहे.दरम्यान प्रशासनाने संभाजी चौक ते डॉ.बनकर हॉस्पिटल,ग्रामीण रुग्णालय परिसर,साई नगर परिसर आता कोपरगाव शहर पोलीस प्रशासनाने बंद करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे कोपरंगावकर नागरिकांवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

दरम्यान ठाणे येथुन दोन मुलींना घेऊन आजोबा आज आपल्या मूळ गावी धोत्रे आले असता यातील मुलींचे वडील कोरोना बाधित असलेल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे तिघांना श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय मुलिंच्या वसतिगृहात कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. उद्या त्यांचे श्राव तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती कोपरगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close