कोपरगाव तालुका
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान,गणित प्रदर्शन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये कोपरगाव पंचायत समिती, आणि विज्ञान, गणित अध्यापक संघाच्या वतीने आयोजित ४५ वे कोपरगाव तालुका विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या विमलताई आगवण या होत्या.
या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य राजेश आबा परजणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्या वर्षाताई दाणे, कोपरगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, स्कूलचे उपाध्याक्ष किरण भोईर, शाळेचे समन्वयक-सदस्य पोपट झुरळे, कार्यकारी संचालक विशाल झावरे, प्रसिद्ध व्यापारी अरुण वाणी, कोपरगाव एस.टी. कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे, कोपरंगाव नगरपरिषदेचे शिक्षण मंडळ सदस्य दिलीप अरगडे, अॅड.शंकर यादव, शाळेचे प्राचार्य एस.एस.मोरे आदी मान्यवर तसेच तालुक्यातून आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, माता-पालक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.