कोपरगाव तालुका
मुद्रण परिषदेच्या सदस्यपदी अशोक खांबेकर यांची नियुक्ती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र मुद्रण परिषद कार्यकारिणीच्या सदस्यपदी शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना आज प्रदान करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र मुद्रण परिषद गेल्या ७१ वर्षांपासून मुद्रकांचे प्रश्नासाठी कार्यरत असून या संस्थेने पनवेल येथे मुद्रण व्यवसायातील महाविद्यालय सुरू केले असून येत्या वर्षात सुमारे १० कोटी रूपयाचा विकास आराखडा मंजुर केला आहे. कोपरगांव या मध्यवर्ती ठिकाणी परिषदेच्या पुढाकाराने प्रिंटींग क्लष्टर योजना तसेच कोपरगांव येथे मुद्रक भवनाची संकल्पना मान्य केली असून त्यासाठी लवकरच मुद्रकांची बैठक घेण्यात येणार आहे. असे नवनियुक्त सदस्य खांबेकर यांनी सांगितले.अशोक खांबेकर हे कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे वरीष्ठ विश्वस्त असून अनेक सामाजिक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.