कोपरगाव तालुका
कोपरगाव राष्ट्रवादी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला असून आगामी काळातही या पक्षाला उत्तम भवितव्य असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कोरोना महामारीमुळे आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक कुठल्याही आजाराच्या तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन आजाराचे निदान करू शकत नाही.भविष्यात हेच आजार रौद्र रुप धारण करू शकतात त्यासाठी कोणत्याही आजाराचे वेळेत निदान होऊन त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी ही आरोग्य शिबिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत ‘सर्वरोग निदान शिबिर’ आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,रमेश गवळी, जावेद शेख,धनंजय कहार,अशोक आव्हाटे,कार्तिक सरदार,राजेंद्र आभाळे,आकाश डागा, विकास बेंद्रे,सागर लकारे,संतोष शेजवळ,इम्तियाज अत्तार, आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरोना महामारीमुळे आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक कुठल्याही आजाराच्या तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन आजाराचे निदान करू शकत नाही.भविष्यात हेच आजार रौद्र रुप धारण करू शकतात त्यासाठी कोणत्याही आजाराचे वेळेत निदान होऊन त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी ही आरोग्य शिबिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले सर्व रोग निदान शिबीर हा आदर्श व कौतुकास्पद उपक्रम असून अशा शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,आदिनी केले आहे.उपस्थितांचे आभार राजेंद्र वाकचौरे यांनी मानले आहे.