जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

साठवण तलावाच्या पाणी प्रश्नात राजकारण नको-आ. आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी आपण राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांना भेटून पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावला असून आता शहराचा पाणी प्रश्न मिटणार असल्याने आता या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असे आवाहन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी येसगाव ग्रामपंचायत हद्दीत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपण एकदा शिर्डीला पायी जात असताना आपल्याला समृद्धी महामार्गाच्या कामावरून साठवण तलावाचे काम मोफत होऊ शकते अशी कल्पना सुचली व ती नितीन शिंदे यांच्या मार्फत समृद्धीचे ठेकेदार सुब्बाराव यांची भेट शिर्डीत घेऊन आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे.व त्यांनी मातीची तीन विंधन विहिरी मारून चाचणी केली होती व पाणी साठवण तलावातून काढण्यासाठी दोन विद्युत पंप देणार असल्याचे सांगितले असताना नंतर आश्चर्यकारक अचानक नकार दिला होता.त्यावेळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या माणसाची खूप समजूत घालुनही उपयोग झाला नव्हता असे सांगून त्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेल्याची नेमकी टिपणी केली. व आज य तलावाचे काम सुरु झाल्याने आजचा दिवस कोपरगाव शहर वासीयांसाठी “सोन्याचा”दिवस-माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे

कोपरगाव नगरपरिषदेचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता मात्र त्या पुलाखालून राजकारणाचेच पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून गेले होते.मात्र नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे निवडून आल्याने हा प्रश्न बऱ्याच अंशी मिटल्याचे मानले जात होते.त्यांनी मुंबईच्या पहिल्याच दौऱ्यात या प्रश्नाचे गांभीर्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यामुळे त्यांनी या प्रश्नी लागलीच समृद्धी महामार्गाचे ठेकेदार सुब्बाराव रेड्डी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क स्थापित करून कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २७ मधील १०.१५ हेक्टर मधील माती उचलून नेण्याचे फर्मान सोडले होते.त्यामुळे अनेक नखरे करणाऱ्या या कंपनीने राज्यात सत्तापालट होताच आपले शेपूट गुंडाळले त्यामुळे पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचा प्रश्न त्याचवेळी मार्गी लागल्यात जमा झाला होता.प्रत्यक्षात त्याच्या भूमीपूजनाचा मुहूर्त नगरपरिषदेने आज काढल्याने त्याचे उदघाटन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांचं हस्ते दुपारी तीन वाजेच्या सुमारास विधिवत पूजन करून करण्यात आले तयावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे होते.

सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,राष्ट्रवादीचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे.माजी अध्यक्ष पद्मकांत कुदळे,मंगेश पाटील,कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष योगेश बागुल,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,भाजपचे गटनेते रवींद्र पाठक, आरोग्य सभापती अनिल आव्हाड,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष सतीश कृष्णाणी, मोदी मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड,तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,माजी सरचिटणीस राजेंद्र खिलारी,नगरसेवक मंदार पहाडे,अतुल काले, विवेक सोनवणे, मेहमूद सय्यद,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,माधवी वाघचौरे,राजेंद्र वाघचौरे,डॉ.अतिष काळे,डॉ.संदीप मुरूमकर,सेनेचे माजी शहराध्यक्ष भारत मोरे,गायत्रीचे प्रतिनिधी हुशार सिंग,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,व्यापारी महासंघाचे महासचिव सुधीर डागा आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर झाला होता मात्र नागरिक गत विधानसभा निवडणुकीत आपल्यावर विश्वास ठेऊन मतदारांनी आपल्याला निवडून दिल्याने हि “अवघड” बनवलेली बाब एकदम सोपी झाली आहे.पाण्याचा प्रश्न म्हटल्यावर खा.पवार यांनी आपला शब्द खाली पडू दिला नाही.त्यांचे आता आपण मुंबईत गेल्यावर आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकी नंतर आपण शहर विकासाला अध्यक्ष विजय वहाडणे यांना ताबडतोब पाठिंबा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.आता शहर विकासाला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

सदर प्रसंगी पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी “पाच क्रमांकाच्या साठवण तलावाबाबत ठेकेदाराने अचानक पिच्छेमुड केल्याने समस्या गंभीर झाली होती त्यावेळीच काम सुरु झाले असते तर आजपर्यंत संपुष्टात आले असते. आता या कंपनीने त्यावेळी माघार का घेतली ? या खोलात आपण जाणार नाही.ते सर्वांना माहित असल्याचे सांगून त्याला वेगळे स्वरूप येईल असे सांगून माजी.आ. कोल्हे यांचा उल्लेख टाळला आहे.व निवडणूक आता संपली आहे व तलावाचे काम सुरु झाल्याने आता राजकारणही संपले असल्याचे सांगून शस्र म्यान केल्याचे संदेश दिले आहेत.व आजही नागरिकांना स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा खेद प्रकट करून याची लाज वाटण्याची गरज प्रतिपादन केली आहे.निवडणुका येतील जातील.पदे येतील जातील पण नागरिकांच्या प्रश्नात राजकारण आणणे हि बाब अत्यंत दुःखदायक असल्याची टिपण्णी केली.निवडणुकीच्या वेळी जरूर राजकारण करा पण ती संपल्यावर तरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी सर्वकाळ राजकारण नको असे बजावले.अन्यथा तालुका व शहराची वाट लागेल असा इशारा दिला आहे.चार क्रंमांकाच्या साठवण तलावाची माती पाच क्रमांकाच्या तलावाच्या जागेत टाकली असताना काहींनी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांच्या नावाने टाहो फोडला या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.त्यावेळी तलावाचे काम सुरु केले त्यावेळी काही गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांनी ठेकेदाराचा जे.सी.बी.काळे बुरखे घालून तोडून टाकला असल्याचे सांगितले.त्यावेळी त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे कौतुक ,”भोळे आमदार”अशी करून त्यांनी मुंबईच्या पहिल्याच भेटीत खा.शरद पवार यांची भेट घेऊन एका भेटीत सूत्रे हलवली व मोठे अवडंबर माजवलेला तलावाचे काम चुटकीसरशी सोडवले असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.

या वेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले उपस्थितांचे आभार गटनेते विरेन बोरावके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close