कोपरगाव तालुका
शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सदैवकटिबद्ध- आ.आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
शिक्षणाची गंगा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या झोपडी पर्यंत पोहोचविणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श वारसा डोळ्यासमोर ठेऊन तीच वाटचाल पुढे सुरु ठेवली आहे. तोच वसा आणि वारसा घेऊन आपण वाटचाल करीत असून शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी ब्राम्हणगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील जगदंबा शिक्षण मंडळाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय ब्राह्मणगाव येथे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे होते.
यावेळी कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक किसन आहेर, जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे, उपाध्यक्ष अरुण महाजन, सचिव जगनराव आहेर, कार्याध्यक्ष निवृत्ती बनकर, पोलीस पाटील रवींद्र बनकर, ज्ञानदेव गवारे, सरपंच माधुरी आहेर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, जगदंबा शिक्षण संस्था ग्रामीण भागात असून देखील विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे. हि अतिशय समाधानाची व अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा लाभ घेवून आपल्या शाळेचे, आपल्या गावाचे व आपल्या तालुक्याचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा देऊन कितीही मोठे व्हा पण आपल्या शाळेला व आपल्या गुरुजनांना कधीही न विसरण्याचा विद्यार्थ्यांना दिला. वर्धापनदिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळी, चित्रकला व कार्यानुभव प्रदर्शनाची पाहणी करून सहभागी विद्यार्थ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले.