कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिका कर्मचारी कांगोणे सेवानिवृत्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे जेष्ठ कर्मचारी सुरेश दगडू कांगोणे हे नुकतीच आपली २९ वर्षाची सेवा संपवून सेवानिवृत्त झाले आहे.त्यांनी आपल्या सेवेस १९८९ साली सुरुवात केली होती.नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी साठाव्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहे.त्यांचा सत्कार कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदींनी केला आहे.
त्यावेळी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा विधीज्ञ जयंत जोशी,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे, मनोहर शिंदे, दत्ता वायखिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.सेवा निवृत्ती नंतर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी शहर अभियंता रवींद्र सोमोसे यांनीही त्यांचा आपल्या कार्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.सुरेश कांगोणे हे अत्यंत प्रामाणिक कर्मचारी म्हणून पालिकेत त्यांचा लौकिक होता.