कोपरगाव तालुका
वक्तृत्व कला हि एक गुणवत्ताच -प्रा.अशोक सोनवणे यांचे प्रतिपादन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चांगले संवाद कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच आदर्श वक्त्यांची भाषणे नेहमी ऐकून त्यांचे अनुकरण तसेच अनेक ग्रंथांचे वाचन व जतन करून माहिती संकलित केली तरच अभिव्यक्ती कौशल्य विकसित करता येत असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सचिव व नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयाचे ६२ स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी डी.पी.भोसले महाविद्यालय कोरेगावचा विद्यार्थी माने मिथुन दत्तात्रय, द्वितीय क्रमांकाची मानकरी नि.प.गुळवे कॉलेज श्रीगोंदा येथील कु. कुलकर्णी प्रांजल प्रमोद, तृतीय क्रमांकाची मानकरी जी.एम.डी.कॉलेज सिन्नरची कु. पवार अश्विनी झुंबर, व उत्तेजनार्थ तीन मानकरी स्पर्धक अनुक्रमे संजीवनी के.बी.पी. कॉलेजचा भोसले रेवणनाथ दत्तात्रय, डी.एम.सी.कॉलेज, नवी मुंबईची कु. सोनवणे भाग्यश्री विजय, जी.एम.डी.कॉलेज सिन्नरचा चौधरी वृषभ सुशील आदींनी बक्षिसाची लयलूट केली आहे.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीरी महाराज महाविद्यालयात सुशीलाबाई काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ आयोजित दोन दिवसीय भव्य आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे या होत्या.
या कार्यक्रमात लताताई शिंदे प्रसिद्ध उद्योगपती सुनील जगताप, अनिल शिंदे, अशोक खांबेकर,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रमेश झरेकर,डॉ.आर जी. पवार डॉ. विजय निकम, प्रा.दिलीप सोनवणे, सर्व विभाग प्रमुख, संयोजन समितीचे सदस्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
सदर स्पर्धेत विविध महाविद्यालयाचे ६२ स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी डी.पी.भोसले महाविद्यालय कोरेगावचा विद्यार्थी माने मिथुन दत्तात्रय, द्वितीय क्रमांकाची मानकरी नि.प.गुळवे कॉलेज श्रीगोंदा येथील कु. कुलकर्णी प्रांजल प्रमोद, तृतीय क्रमांकाची मानकरी जी.एम.डी.कॉलेज सिन्नरची कु. पवार अश्विनी झुंबर, व उत्तेजनार्थ तीन मानकरी स्पर्धक अनुक्रमे संजीवनी के.बी.पी. कॉलेजचा भोसले रेवणनाथ दत्तात्रय, डी.एम.सी.कॉलेज, नवी मुंबईची कु. सोनवणे भाग्यश्री विजय, जी.एम.डी.कॉलेज सिन्नरचा चौधरी वृषभ सुशील या स्पर्धक विद्यार्थ्यांनी क्रमश: ९००१, ७००१, ५००१ व १००१ अशी बक्षिसे मिळविली.माजी खा.शंकरराव काळे यांच्या विषयावर लक्षवेधी बोलणाऱ्या स्पर्धेची मानकरी कु. कुलकर्णी प्रांजल प्रमोद हिला रुपये १००१ चे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आणि सांघिक फिरता स्मृती करंडक जी.एम.डी.कॉलेज सिन्नरचे विद्यार्थी – चौधरी वृषभ सुशील व कु. पवार अश्विनी झुंबर या विद्यार्थ्यांनी पटकवला.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. थोपटे यांनी केले. उपस्थितांना पुष्पाताई काळे यांनी मार्गदर्शन केले.तर पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चित्रा करडे व प्रा.प्रकाश सावंत यांनी केले. तर निकाल वाचन व मान्यवरांचे आभार प्रा.छाया शिंदे यांनी मानले.
सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे, संयोजन समिती, कार्यालयीन अधीक्षक वसंतराव पवार , सर्व शाखांचे उपप्राचार्य यांचे सहकार्य लाभले.