जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

साई संस्थानच्या वतीने साईभक्‍तांना ११ हजार वृक्षांची रोपे वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने पर्यावरणाच्‍या संरक्षणासाठी शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन तसेच वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या साईभक्‍तांना आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की, त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन-२०१७ ते २०१९ या दरम्यान राज्यामध्ये पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सन २०१६ मध्ये २ कोटी, सन २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून सन २०१७ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.शासनाच्या निर्णयाला सहाय्यक भूमिका घेऊन संस्थानने हा उपक्रम हाती घेतला आहे.

पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी तसेच शिर्डीत आलेल्‍या साईभक्‍तांना सावली मिळावी व वातावरणात प्रसन्‍नता राहावी याकरिता संस्‍थान परिसरामध्‍ये १००० वृक्षांची लागवड करणेत आलेली आहे. या वृक्षलागवडीमुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. दिनांक २६ जुलै २०१९ रोजी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते साईभक्‍तांना मोफत १००० निंबवृक्षाची रोपे वाटप करणेत आलेली आहेत. त्‍याचप्रमाणे मंगळवार दिनांक १७ सप्‍टेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे विश्‍वस्‍त बिपीन कोल्‍हे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १५०० निंबवृक्षांची रोपे वाटप करण्‍यात आलेली आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्‍हणूनच श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०१९ पासून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी येणा-या साईभक्‍तांना समाधी मंदीर परिसरात (लेंडीबाग गेट क्रं. ५ जवळ) प्रसाद रुपाने नियमित मोफत रोपे वाटप करणेत येत आहेत जेणेकरुन साईभक्‍त आपल्‍या घरी या रोपांची लागवड करतील. याची माहिती साईभक्‍तांना होणेकरीता मंदीर परिसरात वेगवेगळया भाषेत फलक ही लावण्‍यात आलेले आहेत. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध राज्‍यांतुन येणा-या साईसेवकांना वृक्ष वाटपाच्‍या सेवेचा लाभ दिला जात आहे. सदर मोफत वृक्ष वाटप उपक्रमामध्‍ये अशोका, शिसम, वड, आवळा, चिंच, जांभूळ, निंब अशा विविध प्रकारच्‍या रोपांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.

या मोफत वृक्ष वाटप उपक्रमामधुन आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे साईभक्‍तांना मोफत वाटप करण्‍यात आलेले असून यापुढेही मोफत वृक्ष वाटप उपक्रम सातत्‍याने राबविला जाणार असल्‍याचेही शेवटी मुगळीकर यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close