जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदाकाठ महोत्सव २०२० चे उदघाटन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने आयोजित “गोदाकाठ महोत्सव-२०२०”या उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन शाहिद वीर जवान सुनील वलटे यांची पत्नी मंगलाताई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत २१ बैलगाड्यांमधून पारंपरिक पद्धतीने महिला मंडळांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थिनींचे लेझीम पथक उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे बांबू नृत्य, आखाड्यातील सोंगे, मंगळागौर, वाघ्या-मुरळी, महिला हुंडाबळी पथ नाट्य तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांतून तसेच मिरवणुकीत हातामध्ये असलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

कोपरगाव शहरात जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शंकरराव काळे यांनी १९६२ ते १९७२ या आपल्या कालखंडात महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची स्थापना करून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शिवरात्रीच्या कालखंडात प्रदर्शन भरविण्याची प्रथा सुरु केली होती.मधल्या काळात हे कृषी प्रदर्शन बंद पडले होते व तेथे असलेल्या गाळ्यांची वाट लागली होती.मात्र काही वर्षांपूर्वी कोपरगाव लायन्स क्लबने समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरात ढेपाळलेला व्यापाराला उर्जितावस्था यावी या साठी हि प्रथा नव्याने सुरु करून नागरिकांना या प्रदर्शनाकडे खेचून घेतले होते.त्या नंतर कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान आ. आशुतोष काळे यांनी हि जागा त्यांच्या विश्वस्त व्यवस्थेच्या ताब्यात असल्याने नव्याने सुरु केली आहे.लायन्स क्लबनेही हि प्रथा तारीख बदलून अद्याप सुरु ठेवली आहे हे विशेष !

या वेळी आ.अशोक काळे, अनिल शिंदे, स्नेहलता शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे,जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, उद्योगपती सुनील जगताप, कोल्हापूर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील, मावळत्या सभापती अनुसया होन, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, धरमशेठ बागरेचा,ओमप्रकाश कोयटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार,वर्षाताई कहार,माधवीताई वाकचौरे,सपनाताई मोरे, मुरलिधर थोरात, अशोक खांबेकर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी कोपरगाव शहर व तालुक्यातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार गोरक्षनाथ चव्हाण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close