कोपरगाव तालुका
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाचे दुखणे कायमचे दूर होणार ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पाच क्रमांकाचा साठवण तलाव हा नामी उपाय असताना त्या ऐवजी “निळवंडेची पिपाणी” वाजवून शहरातील नागरिकांची करमणूक होत होती तिला आता फाटा मिळणार असून साठवण तलाव आणि शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत या मूळ दुखण्याच्या कामास १२० कोटी १२ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.काळे यांच्या कार्यालयाकडून उपलब्ध झाली असून त्यास जीवन प्राधिकरण विभागाने दुजोरा दिला असून तसा पुरावा आमच्या प्रतिनिधीच्या हाती आला आहे त्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव पालिकेच्या नूतन पाच क्रंमांकाच्या तलावाचे भूमीपूजनाचे पूर्वीचे छायाचित्र.
निळवंडे बंदिस्त जलवाहिणीचे पाणी निळवंडे धरणाचे पूर्व बाजूस असणाऱ्या टेकडीवर उंचावनी टाकीत विद्युत पंपाचे मदतीने टाकून त्या वीज बिलाचा वर्षाला साधारण तीन ते चार कोटी रुपयांचा भार कोपरगाव करांवर पडणार होता.त्यातून नवीन विजबिलाचे दुखणे निर्माण होणार होते.इथे नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून मिळणाऱ्या प्रवाही सिंचनाच्या पाण्याची पट्टी भरता येत नव्हती.(ती आता जवळपास दहा कोटींवर गेली आहे.) मात्र पालिकेत असणाऱ्या पाशवी बहुमताच्या जोरावर…’या’ सर्व मर्कट लीला सुरु होत्या.त्यातून नवनवीन राजकीय कल्पना लढवून व विनोद निर्मिती होऊन शहरातील नागरिकांची जोरकस करमणूक सुरु होती ती बंद होण्यास मदत होणार आहे.आता राष्ट्रवादीने आगामी नगरपरिषद निवडणूक पाहून त्यातून आपला राजकीय फायदा न उचलला तर नवल! नाही तरी वेगवेगळ्या मंजुऱ्यांच्या नावाखाली निवडणुका काढण्याची कोपरगावच्या राजकीय नेत्यांची खोड जुनी आहे.
कोपरगाव नगरपरिषद वर्तमानस्थितीत चार दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा करत आहे.उन्हाळ्यात हेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आठ ते पंधरा दिवसाआड जाते त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा कृत्रिम रित्या निर्माण केलेला समस्येचा सामना करावा लागतो.कोपरगाव नगरपरिषदेला पाणी कमी नाही मात्र नियोजनाचा अभाव व पाण्याची चोरी,गळती थांबविली तरी हेच २१० द.ल.घ.फूट पाणी पुरु शकते.नव्हे जवळपास चाळीस टक्के शिल्लक राहते हे जलसंपदा विभाग व नगरपरिषदेचा पाणीवापर लेखी स्वरूपात स्पष्ट दाखवून देत असताना फक्त मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावयाची हा खरा प्रश्न होता.कारण यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मूळ दुखणे एकीकडे झाकून ठेवून,”मलम शेंडीलाच लावण्याचा” अनेक वेळा प्रयत्न केला होता.या आधी ज्या दुष्काळी शेतकऱ्यांना निळवंडे धरण व कालव्यांचा ५२ वर्ष थापा मारून खोटी उदघाटने करून व दर निवडणुकीत त्यांची मते घेऊन पोबारा करणाऱ्यांनी गत पाच वर्षांपूर्वी कोपरगाव विधानसभा व शिर्डी शहरातील मतांवर डोळा ठेऊन आपल्या चाली खेळल्या होत्या मात्र सुज्ञ मतदारांनी व १२८ दुष्काळी गावांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीने न्यायिक मार्गाने त्यांच्या राजकीय खेळ्या वारंवार उधळून लावल्या होत्या.त्याला नुकताच दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे.
गत महिन्यात काही पाळीव भाटांना या कामाची प्रगती पाहून पुन्हा शिर्डीत जाऊन निळवंडेची उबळ आली होती. (हि उबळ अर्थातच त्यांनी आपल्या वजीरांच्या आदेशाने केल्या हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे.) शिर्डी नगरपंचायत व येथील साईबाबा संस्थान यांनी आपल्या तलावाला चार कोटी रुपयांचा प्लास्टिकचा कागद टाकून गळती रोखल्याने त्याना साठ दिवस न पुरणारे पाणी आता पाच महिने पुरत असताना काहींना निळवंडेवर चालणारी आपली दुकाने बंद होण्याची भीती वाटत होती.शिवाय हे पाणी निळवंडे धरणाचे पूर्व बाजूस असणाऱ्या टेकडीवर उंचावनी टाकीत विद्युत पंपाचे मदतीने टाकून त्या वीज बिलाचा वर्षाला साधारण तीन ते चार कोटी रुपयांचा भार कोपरगाव करांवर पडणार होता.त्यातून नवीन विजबिलाचे दुखणे निर्माण होणार होते.मात्र शिर्डीतील साई बाबांच्या झोळीतून फुकटचे गाजर दाखवून नागरिकांना मूर्खांच्या नंदनवनात फिरवून आणायचे काम इमाने इतबारे सुरु होते.इथे नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून मिळणाऱ्या प्रवाही सिंचनाच्या पाण्याची पट्टी भरता येत नव्हती.(ती आता जवळपास दहा कोटींवर गेली आहे.) मात्र पाशवी बहुमताच्या जोरावर…’या’ सर्व मर्कट लीला सुरु होत्या.त्यातून नवनवीन राजकीय कल्पना लढवून व विनोद निर्मिती होऊन शहरातील नागरिकांची जोरकस करमणूक सुरु होती.त्याला मात्र दोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जोरदार दणका देऊन घरी बसवले आहे.त्यामुळे नूतन राष्ट्रवादीचे नेतृत्व आ.आशुतोष काळे या नेतृत्वाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती.ती खरी ठरत असताना दिसत आहे.त्याला पहिला पुरावा म्हणून या तलावाचे काम त्यांनी निवडून आल्या-आल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खा.शरद पवार यांना भेटून पाच क्रमांकाच्या तलावातील माती मोफत उचलण्याचा कृत्रिम अडथळा दुर केला होंता.त्या नंतर त्यास तांत्रिक मान्यता हा महत्वाचा टप्पा होता.त्यास १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला जीवन प्राधिकरणाच्या नाशिक स्थित प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांनी जा.क्रं.मु.अ./नाशिक/चि.शा./१८४५ दि.२६ ऑक्टोबर २०२१ अन्वये मंजुरी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव करांना हि दिवाळी भेट ठरली असल्यास नवल नाही.त्यातून नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.
दरम्यान अद्याप आर्थिक तरतूद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे ने वेगळे सांगण्याची सुज्ञास गरज नाही.एखादया प्रकल्पाला “तत्वतः मान्यता” हा कोपरगावच्या नेत्यांनी नवीन पण मतांसाठी ‘लाडका’ शब्द प्रयोग रूढ केला होता.त्यावर अनेकांनी आपली दुकानं चालवली होती.व जनतेला ‘माती’ चारण्याचे पाप केले होते.त्याला आता चाप बसण्यास मदत होणार आहे का? पुन्हा नव्या बाटलीत जुनी दारू भरून विकणार आहे ? हे आगामी काळात उघड होणार आहे.मात्र त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे.त्यामुळे कोपरगावचे आ.आशुतोष काळे व कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे या श्रेयाला पात्र ठरले तर नवल नको!